माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा हितेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुका व शहर युवक काँग्रेसने अमळनेर येथील शांतीनगर भागात गरजूंना थंडीपासून बचावासाठी ब्लँकेट आणि स्वेटर वाटप केले.
अमळनेर : माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा हितेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुका व शहर युवक काँग्रेसने अमळनेर येथील शांतीनगर भागात गरजूंना थंडीपासून बचावासाठी ब्लँकेट आणि स्वेटर वाटप केले. यावेळी अमळनेर तालुका काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष बी के सुर्यवंशी, युवक काँग्रेस चे जिल्हा सचिव हर्षल जाधव , काँग्रेस माजी शहराध्यक्ष सईद तेली, अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश दगडु पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली, शहरकार्याध्यक्ष कुणाल चौधरी, शुभम खंबायतकर, शादाब तेली,अशोक सोनवणे , रमेश सोनवणे, संग्राम सोनवणे, नितीन सोनवणे,कुणाल पाटील, घनश्याम महाजन, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






