Amalner

हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न

हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न

अमळनेर प्रतिनिधी-हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर या संघटनेची सहविचार सभा नुकतीच संपन्न झाली. सहविचार सभेत अध्यक्षस्थानी हिंदी अध्यापक मंडळाचे नुतन तालुका अध्यक्ष आशिष शिंदे होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी अध्यक्ष दिपक पवार यांनी संघटनेचा लेखाजोखा मांडला .हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने
वेगवेगळ्या क्षेत्रांत नावलौकिक करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. हिंदी अध्यापक मंडळाचे नुतन अध्यक्ष आशिष शिंदे सेट परीक्षा उत्तीर्ण झाले,जिल्हा कार्यकारणी सदस्य एन.आर.चौधरी पेट परीक्षा उत्तीर्ण झाले, सहसचीव भारती भांडारकर यांना पत्रकार संघाच्या वतीने नाशिक येथे
राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला,हिंदी मंडळाचे प्रसिध्दप्रमुख ईश्वर महाजन यांना पत्रकारिता क्षेत्रात पार्लमेंट इंटर नँशनल पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल हिंदी अध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष दिपक पवार, सचीव दिलीप पाटील, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील , डॉ किरण निकम,सौ निरंजना वानखेडे, मनीष उघडे,सोपान भवरे,मुनाफ तडवी यांनी सत्कार केला.

हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने सानेगुरुजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतपेढीच्या नुतन महीला अध्यक्षा सुलोचना पवार यांचा सत्कार करण्यात आला.
हिंदी अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे, सर्व शिक्षक एकमेंकाच्या सुख दुख्खात सहभागी असतात. मंडळाच्या कार्यकारणी सदस्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार झाल्याबद्दल आनंद वाटत असून मंडळाची उत्तरोत्तर प्रगती होवो असे सौ निरंजना वानखेडे यांनी सांगितले.
तर अध्यक्षीय भाषणातून आशिष शिंदे यांनी आगामी वर्षांत राबवायच्या उपक्रमात सविस्तर चर्चा केली. सचिव दिलीप पाटील यांनी अनुमोदन दिले.कार्यक्रमाचे आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button