बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व गर्जना संघटनेचे शेतकरी बांधवांसाठी आक्रमक आंदोलन..
असद खाटीक धुळे
धुळे : देशातील शेतकऱ्यांच्या मागण्या फेटालून केंद्र सरकारने आपला असंवेदनशील चेहरा उघड केला आहे.म्हणून बी.आर.एस.पीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.डॉ.माने साहेब यांच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी बांधवांच्या समर्थनार्थ आज धुळे जिल्हा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व गर्जना संघटनेच्या वतीने तीव्र निषेध नोंदवत कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे येथे आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन केले गेले.
यावेळी हे तीन नवे कायदे -शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020
शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती)कायदा 2020 पूर्णपणे रद्द करून किसान कोर्ट स्थापन करून हमी भाव मिळवण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केंद्र सरकार कडे केली गेली.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रमुख संघटक आनंद लोंढे ,जितू जगताप-व्या.आघाडी अध्यक्ष,भालचंद्र सोनगत(उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष,मा. विजय सावकारे-धुळे जिल्हाध्यक्ष,महेंद्र पाटील( जिल्हा संघटक,धुळे), जिल्हाध्यक्ष,.ऍड.विनोद वाघ-धुळे जिल्हाध्यक्ष वकील आघाडी, दीपक पाटील-वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष, सौ.सुरेखाताई दीपक पाटील-धुळे जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, सौ. संगीता गुलाबराव पाटील-शहर अध्यक्ष महिला आघाडी, सलीम शिकलीकर-व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष, इम्रान पठाण-धुळे शहर अध्यक्ष,मोहन शिंदे,प्रविण पाटील,अविनाश पाटील,दिनेश गांगुर्डे, नईम हिरो,व प्रमुख पदाधिकारी शेतकरी बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आनंद लोंढे
(महाराष्ट्र प्रमुख संघटक,संस्थापक अध्यक्ष, गर्जना)






