Faijpur

फैजपूर येथील ऐकलव्य आदिवासी भिल्ल समाजाचे समाज बांधवांनी आमदार शिरीष दादा चौधरी यांना निवेदन..

फैजपूर येथील ऐकलव्य आदिवासी भिल्ल समाजाचे समाज बांधवांनी आमदार शिरीष दादा चौधरी यांना निवेदन..

प्रतिनिधी : सलीम पिंजारी

फैजपूर : निवेदनात दक्षिण बाहेरपेठ कडील पडित‌ जागेवर पिढ्यान् पिढ्यागवताच्या,कौलारु,
छप्पराचे झोपड्यात रहात असुन आजपर्यंत आमच्या झोपडपट्टी,उच्याटन , पुनर्वसना‌, विकासाकडे ‌कोणी लक्ष दिले नाही.शौचालय नाही,स्नानगृह नाही आम्ही अतीशय मागासवर्गीय गरिबी आदिवासी भिल्ल अनुसूचित जमाती चे नागरिक असुन हातावर‌ मोल मजुरी करून उपजीविका करीत आहे.आम्ही ज्या जागेवर रहात आहेत.त्या जागेवर‌ पक्की घरे बांधून आमचे नावावर करून मिळावी व आम्हाला जातीचे दाखले मिळत नाही आमचे कडे‌ जुने कागदपत्रे नाही,आम्ही अशिक्षित आहोत,तरी आम्हाला विनाप्रायस जातीचे दाखले मिळावे. आम्ही घरकुलापासुन वंचित आहेत तरी आम्हाला वरीलप्रमाणे सर्वांना मालकी हक्काची घरकुलांचा लाभ मिळावा म्हणून माननीय आमदार शिरीष दादानां निवेदन देवून कथन केले, श्री अशोकजी भालेराव समाज सेवक , ‌आमचे सोबत उपस्थित राहुन श्री शिरीष दादा चौधरी‌ आमदार साहेबांना आमचे घरकुलाचे आवश्यकते बाबत योग्य माहिती देवून ‌विंनती केली‌ .सदर समाजाला त्वरीत घरकुल योजनेचा फायदा मिळावा.आमचे
निवेदन आमदार शिरीष दादा चौधरी ‌यांनी सहानुभूतीपूर्वक वाचन करून फैजपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री‌ चव्हाण साहेबांना दुरध्वनी वरुन लागलीच सुचना‌ दिल्या की फैजपूर येथील ऐकलव्य आदिवासी भिल्ल समाज नागरीक यांचे घरकुलाचे बाबत लक्ष घालून घरकुलाचा लाभ देण्यासाठी योग्य‌ ती नियमानुसार कायर्यवाही करावी.व आमदार श्री शिरीष दादा‌ चौधरी यांनी एक लव्य आदिवासी भिल्ल समाज बांधव दक्षिण बाहेर पेठ फैजपूर सर्व लोकांना , कोणीही सुटले जाणार याची दक्षता ‌घेवुन‌ सर्वांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना,माधव‌ नरसो भिल,चडामण लालु भिल,मांगो बाबुराव भिल, रा.का.सामाजीक न्याय विभाग फैजपूर शहर अध्यक्ष श्री अशोकजी भालेराव, चावदस भिका भिल,छगन बुधो भिल.,,‌शरद भाउ भिल,गणेश‌ भिल,गोविंदा भिल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button