नूतन सी.ई.ओ. संजयसिंह चव्हाण यांचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटने मार्फत स्वागतपर सत्कार…
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा शाखा कोल्हापूर च्या वतीने आज नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले. संघटन ची ओळख आणि शिक्षकांचे प्रश्न या अनुषंगाने अगदी थोडक्यात चर्चा करण्यात आली. सर्व संघटनांच्या मागणीनुसार सर्व शिक्षक संघटनांची बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार आहे याची कल्पनाही त्यांनी दिली.
या भेटीसाठी जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे, जिल्हा कोषाध्यक्ष निलेश कारंडे, जिल्हा प्रवक्ते प्रमोद पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मारुती फाळके,स्वप्निल सांगले, दिपक गायकवाड, अमित सूर्वे, बालाजी पांढरे, गिरीश प्रभू, विजय कोरवी, संतोष कोळी, विश्वनाथ बोराटे, दीपक पाटील, सुरेश देसाई उपस्थित होते.






