Maharashtra

माझ्याबद्दल केलेली तक्रार हेतुपुरस्कर व सुडबुध्दीने – ग्राम विकास अधिकारी डी.आर. जयंकार

प्रतिनिधी मुबारक तडवी

माझ्याबद्दल केलेली तक्रार हेतुपुरस्कर व सुडबुध्दीने – ग्राम विकास अधिकारी डी.आर. जयंकार

नातेवाईकाचा मृत्यू झाल्यामुळे दिनांक 31 रोजी गैरहजर
प्रतिनिधी मुबारक तडवी मोठा वाघोदा.ता.रावेर.
मोठा वाघोदा येथील ग्रामपंचायतीला दिनांक 31 मार्च रोजी सन्माननीय सभापती रावेर जितेंद्र पाटील यांनी दिलेल्या भेटीदरम्यान ग्रामविकास अधिकारी गैरहजर असल्याचे व ग्रामपंचायतीला कुलूप आढळले असल्याचे निदर्शनास आले मात्र मी दिनांक बावीस रोजी जनता कर्फ्यू असल्यामुळे गावातच कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये व जनतेने त्याचे तंतोतंत पालन व्हावे या उदात्त हेतूने मोठे वाघोदा ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांसह मोठे वाघोदा गावात ठाण मांडून होतो तसेच दिनांक 23 रोजी ग्रामपंचायतीची मासिक सभा असल्याने सभेचे आयोजन हि केले होते.त्याच दिवशी रावेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एच.एन.तडवी,,सी.आर.महाले डि.एच.सोनवणे साहेब यांनीही सहकार्‍यांसह ग्रामपंचायतीला भेट दिली होती त्याच दिवशी मी गावातील आरोग्य विभाग कर्मचारी सर्व आशा सेविका, अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी *समवेत* संपूर्ण गावात फिरून बाहेरगावाहून आलेले लोकांची माहिती घेऊन यादी तयार करण्याचे काम ही केले तसेच दिनांक 24 मार्च रोजी बाहेरगावाहून आलेल्या होम क्वार्टनटाईम केलेल्या व्यक्तींना घरातच राहावे अशी नोटीस वजा ताकीत गावातील कर्मचारीसह स्वता बजावली दिनांक 25 रोजी गुढीपाडवा असल्याने ग्रामपंचायतीचे कर्मचारी क्लार्क यांच्याशी संपर्क करून कामाचा आढावा घेतला दिनांक 26 मार्च रोजी ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी यांचेकडून हातपंप आणि पावडरची गाव निर्जंतुकीकरण करण्याकरिता फवारणी करून घेतली तसेच गावातील घाण कचरा उचलून ट्रॅक्टरद्वारे गावाबाहेर नेऊन टाकला तसेच रात्री पाणी पुरवठा कर्मचारी यांना सांगुन दुरुस्ती चे काम करवून घेतले दिनांक 27 मार्चला अविरत टीसीएल पावडर फवारणी बाहेरगावाहून आलेल्या लोकांची माहिती घेतलेअनुक्रमे 28 व 29 मार्च रोजी शनिवार व रविवार असल्याने तरीही कर्मचाऱ्यांशी संवाद साधून फवारणी करणेबाबत व केलेल्या उपाययोजना कामकाजाचा आढावा घेतला दिनांक 30 मार्च रोजी गावातील बाहेरगावाहून आलेले व्यक्तींना होम कॉ्वान टाईम केलेल्यांना पाहणी करून त्यांच्या नावांची यादी तयार केली गावातील पीठ गिरणी धारक व दुग्धव्यवसाय व्यवसायिकांना जाणीव पत्र संरक्षण व नियमांचे पत्र देण्यात आले मात्र दिनांक 31 मार्च रोजी माझ्या जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यामुळे मला अंत्यदर्शनासाठी जाणे जरुरीचे असल्याने गैरहजर असल्यामुळेच गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी सूडबुद्धीने व हेतुपुरस्कर आरोप महाशय सभापती पंचायत समिती रावेर यांनी अचानक दिलेल्या भेटीदरम्यान केलेले आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button