Dhule

बुडकी येथे आरोग्य कर्मचारी व आशा कर्मचारी ह्या कोरोना योद्ध्यांचा जय आदिवासी युवा शक्ती(जयस) तर्फे सन्मान व सत्कार.!

बुडकी येथे आरोग्य कर्मचारी व आशा कर्मचारी ह्या कोरोना योद्ध्यांचा जय आदिवासी युवा शक्ती(जयस) तर्फे सन्मान व सत्कार.!

राहुल साळुंके धुळे

धुळे : आज १८फेब्रुवारी बुडकी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी ह्यांनी कोविड माहामारीच्या भयावह अश्या कठीण काळात संपूर्ण भारत एकजूट होऊन महामारिशी लढत असताना अशा कठीण परिस्थितीत आरोग्य विभागातील लोक करीत असलेली सेवा अतुलनीय आहे, ह्यांच्या ह्या सेवेने सर्वांसमोर मानवतेचे एक नवीन उदाहरण ठेवले आहे, जेव्हा संपूर्ण जग, देशातील तसेच परिसरातील लोक घाबरून होते लॉकडाऊन मधे घरातच होते त्यावेळेस त्यांची देवरुपी कार्य, वैद्यकीय व आरोग्य सेवा अभिमानास्पद आहे ह्यांचे देवरुपी महान कार्य पाहून जय आदिवासी युवा शक्ती(JAYS) महाराष्ट्र, शिरपूर टीम तर्फे “कोरोना योद्धा” गौरव सन्मान पत्राने सन्मानित करण्यात आले.

ह्यावेळी सरपंच नितिन पावरा, उपसरपंच सुक्राम पावरा, प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.निलिमा देशमुख, उपकेंद्र बुडकी येथील समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पावरा, जयस शिरपूर तालुका उपाध्यक्ष जगदीश पावरा, बिरसा ब्रिगेड शिरपूर तालुका अध्यक्ष भरत पावरा, राजन पटले, विशाल कोळी, संदीप पवार ह्यांनी कोरोना योद्ध्यांचे सन्मान व गौरव केला व आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button