Dhule

ग्रामपंचायत कोडीद मार्फत कोविड सर्व्हेसाठी लागणारे साहित्य उपकेंद्र कोडीदला उपलब्ध केले.

ग्रामपंचायत कोडीद मार्फत कोविड सर्व्हेसाठी लागणारे साहित्य उपकेंद्र कोडीदला उपलब्ध केले.

राहुल साळुंके धुळे

धुळे : सध्या संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात सगळीकडे कोरोना आजाराने हाहाकार माजविला आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
त्याअनुषंगाने आज कोडीद येथील प्राथमिक उपकेंद्र कोडीद येथील आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स ह्यांना प्राथमिक सर्व्हे साठी लागणारे साहित्य त्यात थर्मल गन, पल्स ऑक्सीमीटर, सेनिटायझर, ग्लोज, मास्क ह्यांची मागणी केली असता कोणताही विलंब न लावता तातडीने ग्रामपंचायतीने सर्व्हेसाठीे लागणारे साहित्य व साधनसामुग्री उपलब्ध करून दिली.
ह्यावेळी पोलीस पाटील श्री.भरत पावरा, उपसरपंच गौतम सोनवणे, ग्रामविकास अधिकारी संजय सुर्यवंशी आदी ग्रामस्थ ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक उपकेंद्र कोडीद चे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांच्याकडे सदर साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

ह्यावेळी डॉ.हिरा पावरा ह्यांनी ग्रुप ग्रामपंचायत कोडीदचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button