Nashik

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघाड वस्ती येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघाड वस्ती येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघाड वस्ती येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष हरीदास पेलमहाले होते .यावेळी व्यासपीठावर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सुनिल पाटील पेलमहाले ,मणुबाई पेलमहाले,जिजाबाई गावंढे, हर्षदा गावंढे,मेघराज गावंढे,पेसा समिती अध्यक्ष धनराज गावंढे, मा.सरपंच शांता गावंढे,मा.सरपंच साहेबराव गावंढे, मा.उपसरपंच दत्तात्रेय गावंढे, रोहिदास गावंढे,सुभाष जाधव,दत्तात्रेय पेलमहाले,तानाजी गावंढे,दिगंबर गावंढे,हरीभाऊ पेलमहाले,सोमनाथ लांडे,उमेश पेलमहाले,सागर पेलमहाले,मुख्याध्यापिका शोभा सूर्यवंशी मॅडम मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास पेलमहाले सर यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या .आपल्या भाषणातुन त्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले व मोठ्या कष्टातुन मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले .
याप्रसंगी सरस्वती व भारतमाता यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले, राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण माजी पंचायत समिती सदस्य सुनिल भाऊ पेलमहाले हस्ते करण्यात आले.
यावेळी संविधान उद्देशिकाचे वाचन दत्तात्रेय गावंढे यांनी केले .व संविधानाचे महत्व विशद केले .

कार्यक्रमास शालेय समितीचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील नागरीक, पत्रकार, सहकारी संस्थाचे पदाधिकारी, देणगीदार, ग्रामस्थ ,केंद्रप्रमुख खोसे मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विलास पेलमहाले सर यांनी केले व मनोगत आभार प्रदर्शन सुनिल पाटील पेलमहाले यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button