माझे गाव माझे योगदान; प्रत्येक गावागावात अभ्यासीका अभीयान
औरंगाबाद :- गणेश ढेंबरे
औरंगाबाद :- श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना मीडीया प्रभारी व प्रवक्ता तसेच राजपूत / परदेशी सामाजीक प्रतीष्ठानचे सर्व पदाधिकारी यांच्या सामुदायिक प्रयत्नाने जोडवाडी ता. संभाजीनगर. जिल्हा. संभाजी नगर (औरंगाबाद) येथे या गावातील सुशिक्षीत लोकांनी व गावकरी मंडळींनी यांच्या सर्वांच्या सहभाभागातुन “श्री सरस्वती अभ्यासीका ” निर्माण करण्यात आली. या अभ्यासीकेचे उद्घाटन सेवानिवृत मुख्याध्यापक संताजी वैराळकर यांच्या हस्ते करण्यात आले. राजपूत / परदेशी सामाजीक प्रतिष्ठानचे सर्व पदधीकारी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना मीडीया प्रभारी व प्रवक्ता श्री केशरसिंह नागलोत पिवळवाडीकर यांच्या संयुक्तीक प्रयत्नाने या अभ्यासिकेला 2O,OOO रु किमतीचे पुस्तके व नोटबुक रजीस्टर उपलब्ध करुन देण्यात आली. हा कार्यक्रम सफल करण्यासाठी श्री भागवत बिघोत, श्री जयलाल राजपूत, चैनसिंह नागलोत, तोतारामदादा, रामसिंह बहुरे, लक्ष्मनसिंह नायमने, महाजन, जारवाल, सेवानिवृत मुख्याध्यापक श्री संताजी वैराळकर, भागचंद बम्हनाथ गुरुजी, संपूर्ण जोडवाडी गावकरी मंडळी व श्री केशरसिंह नागलोत प्रदेश मीडिया प्रभारी व प्रवक्ता यांचे विशेष योगदान लाभले आहे.






