नगरपंचायतची 70 किलो प्लास्टिक व दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई प्लास्टिक बंदी बाबत धडक मोहीम
दिलीप वाघमारे
लोणंद दिनांक 13 प्रतिनिधी शहरामध्ये पंचायतीचे नूतन मुख्याधिकारी हेमंत ढोकले
यांच्या मार्गदर्शनाखाली 13 मार्च रोजी आठवडा बाजारांमध्ये धडक मोहीम राबवून 70 किलो प्लॅस्टिक व दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई व्यापाऱ्यांच्या वर केली त्यामुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे नगरपंचायत चे कर्मचारी यांनी जनजागृती करून व्यापाऱ्यांना प्लास्टिक बंदी बाबत सूचना यापूर्वी केली होती तरी सुद्धा आठवडा बाजार दिवशी नगरपंचायत कर्मचारी बाजारांमध्ये ठिकाणी प्लास्टिकवर बंदी घालण्याबाबत ठिकाणी चौकशी करून काही व्यापारांचा प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या व दंडात्मक कारवाई सुद्धा केली आहे.
त्यामुळे संपूर्ण शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे शंभर टक्के प्लास्टिक बंदीसाठी नगरपंचायत मुख्याधिकारी हेमंत ढोकलेयांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र चळवळ सुरू आहे आणि यामुळे बाजारपेठेमध्ये प्लास्टिक बंदी चा नारा घुमू लागला या सक्रिय मोहिमेमध्ये तुपे शिरसागर शंकर शेळके यांनी भाग घेतला.






