यवतमाळ

जामवाडी येथे वीज वितरणाच्या अभियंत्यांनी केली पाहणी :-

जामवाडी येथे वीज वितरणाच्या अभियंत्यांनी केली पाहणी :-

गुरुदेव युवा संघाच्या पाठपुराव्याने मिळणार आदिवासी बांधवाना वीज जोडणी

रुस्तम शेख

यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील
जामवाडी येथील गोर गरीब कोलाम पॉड आदिवासी समाज वार्ड क्रमांक ३ येथे गोरगरीब आदिवासी मागील २० वर्षांपासून विजेअभावी अंधारातच जीवन व्यतीत करीत होते. जमवाडी येथे विजेची व्यवस्था नाही. विद्युत खांब नाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. शॉचालाय नाहीय पंत प्रधान आवास योजने अंतर्गत एकही घरकुल बनले नाही . त्यामुळे येथील नागरिक गोरगरीब आदिवासी यांचे मतदान सरकार व प्रशाकिय यंत्रणा काढते मात्र सुविधेच्या नावावर एकही काम होत नाही यवतमाळात जिल्ह्यात आदिवासी विकास मंत्री असताना कोलाम समाजावर अन्याय होत आहे. हि बाब लक्ष्यात येताच
गुरुदेव युवा संचाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी जमवाडी गावाला भेट दिली. त्यानांतर गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी नेर येथील वीज वितरणाच्या अभियंत्यांना भेटून जामवाडी येथील गोरगरीब नागरिकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाबाबत अवगत केले.
जमवाडी येथे तातडीने विद्युत व्यवस्था करावी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. गोरगरीब आदिवासी कोलाम समाजाला अंधारात ना ठेवता न्याय द्यावा अशी मागणी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी केली होती. .
त्यावर नेर येथील वीज वितरणाचे उपकार्यकारी अभियंता तळेगावकर, तसेच लाडखेड सुबस्टेशनचे सहाय्यक अभियंता जी. एन सिंघाने यांनी जामवाडी गावाला भेट देऊन पाहणी केली. तसेच लवकरच येथे विद्युत पथदिवे व नागरिकांना वीजजोडणी करून देऊ असे आश्वासन दिले. यावर गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी सर्व आदिवासी बांधवांचे वीज मागणी अर्ज ओंलीने भरून घेतले.
मागील २० वर्षांपासून विजेअभावी अंधारात जीवन जगणाऱ्या गोरगरीब आदिवासी बांधवाना आता लवकरच वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे समस्त गावकर्यांनी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांचे आभार मानले. यावेळी यावेळी सौ निर्मला खरवंडी, दुर्गा मानकर, रंकाळा देवके, विलास पाने, सुभाष काळे, श्रावण पाने, तुळशीराम वाकडे, प्रमिला देशपांडे, प्रदीप चेके, यासह जमवाडी येथील समस्त कोलाम तथा आदिवासी बांधव उपस्थित

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button