Amalner

आई म्हणचे आई असते मोठे जरी झालो तरी ती आपल्यातच गुंतलेली असते भारती अहिरे शिरूड

आई म्हणचे आई असते
मोठे जरी झालो तरी ती आपल्यातच गुंतलेली असते
भारती अहिरे शिरूड

रजनीकांत पाटील

अमळनेर : आईची माया आई म्हणजे आई असते
तिला सर्वांच गोष्टींची घाई असते
आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तीच असते ती आई असते
न केलेले प्रश्न सोडवण्यातही सक्षम आई असते
वेड्यासारखं वागल्यावर, ऐवढी अक्कल कशी नाही म्हटते
वळण लावण्यासाठी दोन-चार धपाटेही देते
आपण रागाने झोपी गेलो की नकळतच डोक्यावरुन हात फिरवते ती आई असते
स्वत:च्या वागणुकीची मनातल्या मनातच माफी मागते
गुपचुपच मित्र-मैत्रीणींसोबत सिनेमाला जायची परवानगी देते
सांगून बाहेर पडलो तरी वाट बघत असते
पोट भरलं असलं तरी बळजबरीने घास भरणारी आई असते
ती आपल्याला काळजीत बघून तळमळ असते
आजारी झाल्यावर स्वत: डॉक्टर होऊन आपल्या जवळ बसते
वेदनामुळे नुसत आईईई शब्द जरी काढला की लगेच धावत येऊन जवळ हजर असते
आपण जागे असलो तर तिची पापणी लागत नसते
आपण खूश असलो तर कारण न जाणून घेता स्वत: ही हसते
यश मिळाल्यावर अश्रु भरलेल्या डोळ्याने भरभरुन बघते
जवळ असो वा दूर जीव आपल्यात अडकून ठेवते
मर्जीविरुद्ध किती तरी निर्णयांना प्रेमापोटी होकार देते
काही विस्टकले की वडिलांच्या तापटपणाच्या आचेपासून वाचवते
पुढल्या वेळी असे करु नको म्हणत पांघरुण घालते
आपली आवड-नाआवड तिला तोंडी पाठ असते
किती जरी मोठे झालो तरी आपल्यातच गुंतलेली असते
नि:स्वार्थ प्रेम आणि नातं काय हे तिच्याकडून शिकायला मिळते
खरंच आई ही देवाहून मुळीच कमी नसते
आई म्हणजे खरंच आई असते मायेचा सागर असते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button