मॉन्टी साळी यांनी वाढदिवसानिमित्त धान्य वाटप करून घडविले माणुसकी चे दर्शन
अमळनेर शहरात कोरनाचे थैमान सुरू असताना वाढदिवसानिमित्ताने धान्य वाटप करून अक्षय (मॉन्टी)साळी यांनी माणुसकीचे दर्शन घडविले.
प्रताप साळी (माजी नगरसेवक ) यांच्या मुलगा व दीपक साळी (अर्बन बँक संचालक) यांच्या पुतण्या यांनी चंद्रमणी संदानशिव,निखिल चौधरी, दादु पाटील, ऋषभ जैन, अजय महाजन, सचिन भोई, अजय नेतकर, प्रकाश बिराडे, गौरव पाटील, शुभम पाटील, पिंटू यांच्या मदतीने सोशल डिस्टन्सचे पालन करत पैलाड भागातील मातंग वाडा व भिल्ल वस्ती परिसरात गोरगरीब गरजवंतांना गहू, तांदूळ ,साबण ,मास्क 111 लोकाना वाटप करून वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला.त्यांच्या या कार्याचे सगळ्या स्तरातून कौतुक होत आहे.






