बाळापूर शिवारात देशी विदेशी दारू जप्त
राहुल साळुंके
शहरापासून जवळच असलेल्या बाळापूर गाव शिवारातील हॉटेल खान्देश मेवा जवळ दारू विक्री करणाऱ्याला तालुका पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून १८ हजाराची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली.बाळापूर शिवारात हॉटेल मेवा जवळ एक जण विना परवाना देशी विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली व त्या माहितीच्या आधारे तालुका पोलिसांनी रात्री ९ वाजेच्या सुमारास छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांनी १८ हजार २७७ रुपये किंमतीची देशी विदेशी दारू जप्त केली.सुमित पद्माकर भावसार(वय-२५) रा.ग.नं.८ पंचवटी देवपूर धुळे असे बेकायदा दारू विकणाऱ्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.तालुका पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






