Amalner

?उर्मट प्र.गटविकास अधिकारीच्या डोक्यावर आमदारांचा हात..?अट्रोसिटी दाखल असूनही अटक नाही..!शासकीय कार्यक्रम संपन्न..!

?उर्मट प्र.गटविकास अधिकारीच्या डोक्यावर आमदारांचा हात..?अट्रोसिटी दाखल असूनही अटक नाही..!शासकीय कार्यक्रम संपन्न..!

अमळनेर येथे आज महा आवास अभियानांतर्गत सर्वांसाठी घरे तालुकास्तरीय अभियान कार्यक्रम आमदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमात जवळपास सर्व वेळ प्र गटविकास अधिकारी हे आमदारांच्या कानात कुजबुज करत मोबाईल मध्ये काहीतरी दाखवीत असल्याचे दिसून आले. आता हा कार्यक्रम फक्त गुज गोष्टी करण्यासाठी घेण्यात आला होता की आमदारांचा प्रत्यक्ष रित्या प्र गटविकास अधिकारी यांच्या डोक्यावर हात आहे हे दाखवून मला कोणी अटक करू शकत नाही हे दर्शविण्यासाठी होता..?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबतीत सविस्तर माहिती अशी की अमळनेर पोलीस स्टेशन येथे दि.०१/१२/२०२० रोजी प्र गटविकास अधिकारी, व इतर 5 व्यक्तीं वर अनु.जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक व्हावी यासंदर्भात मा पालकमंत्री गुलाबराव पाटील,मा सहा उपायुक्त, समाज कल्याण विभाग, मा जिल्हाधिकारी,मा पोलीस अधीक्षक,जळगांव यांना दि 4 डिसेंबर 2020 रोजी फिर्यादी सौ. मायाबाई प्रविण वाघ, लोकनियुक्त सरपंच, मठगव्हाण, ता. अमळनेर, जि. जळगांव यांनी पत्र दिले आहे.

या पत्रातून विनंती करण्यात आली आहे की २१/११/२०२० रोजी अमळनेर
पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी, दोन विस्तार अधिकारी व इतर ३
असे सहा जणांविरुद्ध विरोधात अपात्र करणेसाठी वरिष्ठांना खोटा अहवाल पाठविणे
तसेच एक लाख रुपये लाच मागितली म्हणून अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये लेखी दि. ०१/१२/२०२० रोजी एफ.आय.आर. नोंद केली आहे. यात अट्रोसिटी तसेच खंडणी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे वरिष्ठ अधिकारी म्हणून अशा गुन्ह्यात त्या आरोपींना आजपावेतो अटक नाही. अनु./जातीच्या महिलेस न्यास मिळावा अशी मागणी पत्रा द्वारे करण्यात आली आहे.

?उर्मट प्र.गटविकास अधिकारीच्या डोक्यावर आमदारांचा हात..?अट्रोसिटी दाखल असूनही अटक नाही..!शासकीय कार्यक्रम संपन्न..!

या पार्श्वभूमीवर आज आमदार महोदयांच्या उपस्थितीत शासकीय कार्यक्रम पार पडला असून तालुक्यातील अनु जाती जमातीच्या महिलेला न्याय मिळवून देण्या ऐवजी तालुक्याचे आमदार संबधित अधिकाऱ्याला पाठीशी घालतांना दिसून येत आहेत अशी चर्चा गावात रंगली आहे.संबधित प्र गटविकास अधिकारी अत्यन्त उद्धट असून महिलांशी बोलण्याचे मनर्स नसलेले म्हणून कु प्रसिद्ध आहेत. उपलब्ध झालेल्या फोटो मध्ये गुज गोष्टी केल्या जात असून कार्यक्रम महत्वाचा की गप्पा..? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button