आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्याबरोबर बिरसा क्रांती दलाची विविध विषयावर बैठक संपन्न
पुणे – दिलीप आंबवणे
बिरसा क्रांती दल मावळ तालुक्याच्या वतीने मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या सोबत बैठक पार पडली. आज मावळ तालुकयातील आदिवासी भागातील विविध अडचणीवर चर्चा करण्यात आली.
मावळ मधील आदिवासी गावे जी मिनी माढा मध्ये समाविष्ट नाही त्यांना त्यात समाविष्ट करण्यात यावे याचा प्रस्ताव आपण घोडेगाव ला देऊन मिनी माढातील योजना चालू कराव्यात. आदिवासी गावांना पैसा क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत मागणी केली मावळ तालुकयातील वडेश्वर येथील आश्रम शाळाचे नव्याने नूतनीकरण करण्यात यावे. वडगाव येथील मुलांच्या आदिवासी शासकीय वस्तीगृहासाठी जागा कधी निश्चित करावी.
यावेळी उपस्थित बिरसा क्रांती दलाचे मावळ तालुका अध्यक्ष अंकुशभाऊ चिमटे, उपाध्यक्ष लहू दगडे, उपाध्यक्ष कांताराम असवले, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मारूती खामकर, पुणे जिल्हा संघटक विक्रम हेमाडे, महासचिव उमाकांत मदगे, प्रसिद्धीप्रमुख मधुकर कोकाटे, अशोक सुपे, बाळू पावशे, अण्णा कोकाटे, लक्ष्मण कावळे, जेष्ठ नेते शंकरराव सुपे, अनिल कोकाटे, बजरंग लोहकरे, दशरथ आढारी यावेळी उपस्थित होते.






