Amalner

माऊली मित्र मंडळ वाडी चौक चा अभिनव उपक्रम.. सर्व विसर्जित गणपती चे केले संकलन …

माऊली मित्र मंडळ वाडी चौक चा अभिनव उपक्रम.. सर्व विसर्जित गणपती चे केले संकलन …अमळनेरसध्या संपूर्ण देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचात करता सर्वच सण उत्सव साधे पणाने साजरे करण्याचे आदेश आहेत. सध्या आपत्ती व्यवस्थापन कलम लागू असल्याने नेहमी प्रमाणे गणेशोत्सव साजरा न करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात अमळनेर नदीपात्रात यावर्षी वेगळा उपक्रम राबविण्यात आला.दरवर्षी भाविक भक्त श्री गणेशाची मूर्ती विसर्जन नदी पात्रात करतात मात्र यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक आणि पर्यावरणीय संवर्धन करणारा ठरला.याबाबतीत माऊली मित्र मंडळ वाडी चौक या मंडळाने गेल्या 5 ते 6 दिवसापासून विसर्जित करण्यात आलेल्या मात्र वाहून न जाता अथवा विरघळत नसलेल्या श्री मूर्ती परत काढून एका खोलीत संकलित करण्यात केल्या व या ठिकाणी विशिष्ट 20 जणांची टीम या माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन चित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली नदी पात्रातील न वाहणाऱ्या पाण्यात पडून असणाऱ्या 800 ते 900 श्रींच्या मूर्ती काढून एकत्र संकलित करून त्यांना नगर परिषद व महसूल प्रशासनाच्या स्वाधीन केल्याअनेक भाविक भक्तांनी नदीपात्रात पूजा अर्चा करीत आपला बाप्पा परत आणीत खोलीत जमा करीत दिसून आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button