मराठी रंगभूमी दिनाचे “नटराजपूजन” करून कलावंतांचे केले कौतुक व शासनाचे मानले आभार
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांची उपस्थिती
अमळनेर रजनीकांत पाटील
दिनांक ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिनानिमित्त अमळनेरातील रंगकर्मी संदीप घोरपडे यांनी कोविड १९ चे नियम पाळून, शहरातील कलावंत तसेच माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड, न.पा.प्रशासन अधिकारी संजय चौधरी या मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आमंत्रित करून अतिशय मनोभावे नटराजाचे पूजन करून कलाकारांशी संवाद घडवून आणला.
याप्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील कलाकार उदा. अभिनय क्षेत्रातील,संगीत,नृत्य, लेखन,दिग्दर्शन,नेपथ्य व मिमिक्री कलाकार यांचा मोठ्या संख्येने एकत्र येऊन न.पा.क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकारी यांना धन्यवाद देऊन सन्मानित केले.
महाराष्ट्र शासनाने कलावंतांच्या बेरोजगारीचा विचार करून मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून नाट्यगृहे व सिनेमागृहे खुली करण्याचा जो निर्णय घेतला त्याचा आंनद व्यक्त करून सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले व प्रातिनिधिक स्वरूपात कृषिभूषण साहेबराव पाटील यांना गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.नटराज पूजनासाठी संदीप घोरपडे,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,नरेंद्र निकुंभ,विनय जोशी,हेमंत चौधरी,ज्ञानेश्वर पाटील,संदीप अहिरराव,डी.ए.धनगर,नयना कुलकर्णी,मोहिनी जोशी,हर्षवर्धन पाटील,जान्हवी जाधव,अनुष्का महिंद,आर्यन पाटील,मितूल पाटील,मयूर बावसकर,स्वप्नील चौधरी,प्रवीण जाधव,डी.पी.शिंगाने, सागर चावरीया,गौरव पवार यांच्या सह बऱ्याच कलाप्रेमी मंडळीने उपस्थिती देऊन नटराजास नमन केले.
यावेळी साहेबराव पाटील यांनी सांस्कृतिक चळवळ बळकटीकरणासाठी कलावंतांना आपल्या मनोगतातून ग्वाही दिली.विनय जोशी सरांनी आभार मानून रंगभूमी दिनाची सकारात्मक सांगता झाली.






