Amalner

आमदार चौधरींच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध मंजुरीपत्राचे वाटप

आमदार चौधरींच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध मंजुरीपत्राचे वाटप 

आमदार चौधरींच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध मंजुरीपत्राचे वाटप

अटाळे, ढेकूसीम, अंबासन, चारम येथील अनेक निराधार लाभार्थ्यांना आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते श्रावण बाळ, इंदिरा गांधी, संजय गांधी योजनेचे मंजुरी पत्रक देण्यात आले, लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले असून, ग्रामस्थांतर्फे  आमदार चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी आहेत.

आमदार चौधरींच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध मंजुरीपत्राचे वाटप
 त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन तालुक्यातील लाभार्थ्यांना श्रावण बाळ , इंदिरा गांधी,संजय गांधी योजनेचा लाभ मिळतो, मात्र काही मंडळी मंजूर झालेले पत्र दबाव तंत्र वापरून हस्तगत करतात आणि आपल्या हस्ते वाटप करून स्वतःची पाट थोपटून घेतात. किमान गरिबाच्या भावानांशी खेळणे तरी थांबवा अशी अपेक्षा आमदार चौधरी यांनी व्यक्त केली. याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी, आर्डी उपसरपंच किशोर पाटील, किरण गोसावी,उमेश पाटील, आनंदसिंग पाटील, माजी सरपंच अशोक बाबुलाल पाटील, माजी सरपंच रामदास महादु पाटील, विकासो  चेअरमन अजबसिगं रूपसिंग पाटील, माजी चेअरमन प्रकाश नथु पाटील,
 मधुकर भावसिंग पाटील, किशोर गंगाराम पाटील, संजय चंद्रसिंग पाटील,  दिनेश परत पाटील, किशोर गणसिंग पाटील,  माजी उपसरपंच विक्रम पंडित पाटील,
ग्रामपंचायत सदस्य मुक्तारसिंग प्रताप पाटील, विनोद शिवाजी पाटील, विनोद शिवाजी पाटील, धनसिंग भिमसिंग पाटील ,  ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button