बारामतीकराना मिळाल्या तीन हाय फ्लो नेझल ऑक्सिजन मशिन्स
प्रतिनिधी – आनंद काळे
बारामती – बारामती शहरासाठी कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी तीन हाय फ्लो नेझल ऑक्सिजन मशिन्स मिळाल्या आहेत त्यामुळे बारामतील कोरोना रुग्णाची हेळसांड होणार नाही.बारामतीतील रुई रुग्णालयात कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे,त्याचठिकाणी ह्या मशीन ठेवण्यात आल्याचे सूतोवाच बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी श्री मनोज खोमणे ह्यांनी केली.
या ठिकाणी ज्या रुग्णांना ठेवण्यात येते व ज्यांना ऑक्सिजनची गरज भासते त्यांना हाय फ्लो नेझल ऑक्सिजन मशीन लावण्यात येणार आहे.जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांनी बारा लाख रुपये मंजूर करून त्या मशीन बारामतीकराना उपचारासाठी भेटल्या आहेत.
ज्या रुग्णाना मास्कच्या ऑक्सिजन यंत्रणेचा त्रास होतो,त्याच्यासाठी हाय नेझल ऑक्सिजन मशीन उपयुक्त असल्याचे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ संजयकुमार तांबे यांनी केले.
दरम्यान,एमआयडीसी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या तीन इमारती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे ह्यांनी अधिग्रहित केल्या आहेत.एका वसतीगृह मध्ये 54 व्यक्ती राहू शकतात.तीन इमारतीमध्ये 162व्यक्ती राहू शकतात.या पद्धतीत ज्यांना लक्षणे नाहीत,मात्र पॉसिटिव्ह आहेत,आशाचे घशातील स्त्रवाचे नमुने घेतले जातील,नमुन्याचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना ह्याचठिकाणी ठेवले जाणार आहे.यामुळे बारामतीकरांची उत्तम सोय होणार आहे.






