Ratnagiri

जनगणनेत आदिवासींसाठी स्वतंत्र काॅलम करा: सुशिलकुमार पावरा राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदनाद्वारे मागणी

जनगणनेत आदिवासींसाठी स्वतंत्र काॅलम करा: सुशिलकुमार पावरा राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदनाद्वारे मागणी

रत्नागिरी : सन 2021 च्या जनगणनेत आदिवासींसाठी स्वतंत्र काॅलम करा, अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोवींद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी हा निसर्गपूजक आहे. वाघदेव,बापदेव,डोंगर्या देव,नदी,वृक्ष,प्राणी,पक्षी इत्यादी निसर्गाची संबंधित घटकांचा पूजन आदिवासी समाज पूर्वीपासून आजपर्यंत करत आहे. आदिवासी समाजाची संस्कृती ही स्वतंत्र असून कुठल्याही धर्माशी मिळतीजुळती नाही. आदिवासी समाजाच्या रितीरिवाज,रूढीपरंपरा,जीवनशैली,भाषा,पोशाख इत्यादी विशिष्ट प्रकारचे आहेत. आदिवासी हा हिंदू नाही .आदिवासी हा निसर्ग पूजक असून हिंदू किंवा इतर धर्माच्या संस्कृती प्रमाणे आदिवासी संस्कृती ही वेगळी आहे. आदिवासी संस्कृतीचा कुठल्याही धर्माचा संबंध नाही.
इंग्रजांच्या काळात जणगणनेत प्रपञामध्ये ओबाॅजीनीज,अॅनामिस्ट, ट्रायबल असे म्हणून आदिवासींची ओळख होती. माञ स्वतंत्र भारताच्या जनगणनेत आदिवासींचे अस्तित्व दाबले जात आहे. म्हणून सन 2021 च्या जणगणनेत आदिवासींचा स्वतंत्र काॅलम करण्यात यावा.अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे. तरी आदिवासी समाजाच्या या मागणीचा विचार करावा. अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या कडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button