Amalner

उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध पत्त्यांचा क्लब उध्वस्त..!

उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध पत्त्यांचा क्लब उध्वस्त..!

अमळनेर :

शहरातील निकुंभ कॉम्प्लेक्स शेजारी अवैध पध्दतीने सुरू असलेल्या
पत्त्यांच्या क्लब वर आज उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकत कार्यवाही केली आहे.या कार्यवाहीत चार आरोपी, जुगाराचे साहित्य व सात हजार तीनशे रुपये रोकड इ जप्त करण्यात आले आहे.

या बाबतीत सविस्तर वृत्त असे की जुने बस स्टैंडजवळील निकुंभ कॉम्प्लेक्स जवळ अवैध पत्त्यांचा क्लब सुरू असल्याची गुप्त माहिती अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांनी पथक रवाना केले. पथकातील पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या सोबत पोहचले असता सदर ठिकाणी अवैध पद्धतीने जुगार खेळला जात होता. या धाडीत राहुल परदेशी, भूषण भालेराव, ज्ञानेश्वर अहिरे, इकबाल मन्सुरी ह्या चार आरोपी ताब्यात घेतले असून 7300/- रु तसेच जुगार खेळण्याचे साहित्या सह मुद्देमाल जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

शहरात अवैध धंद्यांना उत आला असून अनेक क्लब सर्रास सुरू आहेत.ह्या कार्यवाही नंतर तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून गल्लोगल्ली सुरू असलेले सट्टा, पेढ्या,जुगार याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.एजंट आणि बुकींची संख्या वाढत आहे त्यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे याकडेही लक्ष द्यावे असेही जन सर्वमान्यातून मागणी होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button