महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन शिरोळ ची सहविचार सभा संपन्न
सुभाष भोसले-कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन उपशाखा-शिरोळ ची सहविचार सभा अतिशय उत्साहात पार पडली.सभेला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे जिल्हा कोषाध्यक्ष निलेश कारंडे,चंदगड तालुकाध्यक्ष आनंद कांबळे व जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
सभेत विषयपत्रिकेवरील विषयांवर चर्चा घडून आली.अनेक सदस्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव,अंशदान हिशोब पावत्या याबाबत माहिती देणेत आली.
जिल्हा कार्यकारिणी मार्फत कै. हरी गायकवाड यांच्या कुटुंबियांना पंचावन्न हजार रुपयांची मदतनिधी ठेवपावती देणेत आली.जिल्हाबदलीने तालुक्यात आलेल्या नूतन बांधवांचे संघटनमध्ये स्वागत करणेत आले.CPM पगार प्रणाली,केंद्रप्रमुख भरती,पदवीधर नोंदणी,विषय शिक्षक पदोन्नती याबाबत जिल्हाध्यक्षांनी मार्गदर्शन केले.विलास तोडकर यांनी बैठक व्यवस्थेचं चांगलं नियोजन केलं होतं,फलकलेखन अतिशय सुंदर रेखाटलं होतं.लक्ष्मीकांत हंकारे यांनी चहानाष्ट्याची सोय अतिशय उत्तम केली.सत्कार समारंभाचे नियोजन सुनील शिरसाट व शरद कांबळे यांनी अतिशय उत्तम पद्धतीने केले होते.सभेचे आभार अमोल कोळी यांनी मानले.
सभेस उपस्थित असणाऱ्या सर्व सन्माननीय कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य बांधवांचे आभार मानणेत आले.सभा व्यवस्थित व्हावी यासाठी धडपडणाऱ्या सर्व शिलेदारांचे कौतुक करणेत आले.






