Faijpur

आंतर महाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालयाचे वर्चस्व तर भालोद व्दितीय स्थानी

आंतर महाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालयाचे वर्चस्व तर भालोद व्दितीय स्थानी

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

फैजपूर- येथील धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव विभाग आंतर महाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धा 2021-22 ह्या यशस्वीरित्या संपन्न झाल्या. धनुर्विद्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ अध्यक्षस्थानी जीमखाना समितीचे चेअरमन डॉ सतिश चौधरी हे उपस्थितीत होते. उद्घाटन समारंभ प्रमुख उपस्थितीत प्रा. डॉ. प्रतीभा ढाके, विद्यापीठ क्रीडा मंडळ सदस्य जळगाव विभागाचे सचिव प्रा. डोंगरे, प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. किशोर वाघ एरंडोल, प्रा. डॉ. मुकेश पवार, प्रा. डॉ सचिन झोपे, प्रा. डॉ. बेलोरकर, प्रा. डॉ. आनंद उपाध्याय, प्रा. सुभाष वानखेडे, प्रा. डॉ. चाँद सर, प्रा. डॉ. महेश पाटील प्रा. उमेश पाटील आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद मारतळे यांनी केले व आभार प्रा. शिवाजी मगर सर यांनी मानले.
आंतर महाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धेसाठी पुरुष गटात सात संघ व महिला गटात चार संघानी सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी संपन्न करण्या करिता तांत्रिक समिती सदस्य म्हणून प्रा. डॉ मुकेश पवार व पंच म्हणून श्री. रायमल भिलाला, निशांत राठोड, दिपके यांनी काम पाहिले. धनुर्विद्या स्पर्धेत पुरुष प्रकारात प्रथम- धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर, व्दितीय- कला व विज्ञान महाविद्यालय भालोद, तृतीय- सदगुरू शारीरिक शिक्षण महाविद्यालय जळगाव तर महिला गटात प्रथम क्र.- धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर व्दितीय क्र. कला व विज्ञान महाविद्यालय भालोद व तृतीय क्रमांक. जनता शिक्षण मंडळाचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय खिरोदा हे राहिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले डॉ. सतिश चौधरी सर यांनी धनुर्विद्या खेळाचा इतिहास आणि जागतिक पातळीवर अस्तित्व या विषयावर खेळाडूंना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा यशस्वी संपन्न करण्या करिता कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सतीश चौधरी, जळगाव क्रीडा समिती चे सचिव प्रा. चंद्रकात डोंगरे, सहसचिव प्रा. डॉ. पी. आर चौधरी, प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. किशोर वाघ, प्रा. डॉ. मुकेश पवार, प्रा. डॉ. महेश पाटील प्रा. सुभाष वानखेडे प्रा. उमेश पाटील आणि सर्व उपस्थितांचे आभार प्रा. शिवाजी मगर सर यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button