Kolhapur

मा. सौ. सावित्रीबाई फुले:- एक सकारात्मक विचारधारा!”. प्रा.डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी,

मा. सौ. सावित्रीबाई फुले:-
एक सकारात्मक विचारधारा!”.
प्रा.डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी,

कोल्हापूर.राजेश सोनुने

सरुड येथे
समतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने सावित्रीमाई फुले जयंती व सत्यशोधक अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात,
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या असीम त्यागामुळेच महिला व्यवस्थेच्या जाचक बंधनातून मुक्त झाल्या.
महिलांनी सावित्रीमाईंच्या त्यागाला न विस्मरता वाटचाल करावी ,असे प्रतिपादन प्रा.आसमा अत्तार यांनी केले. त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
प्रारंभी स्वागत व प्रास्तविक प्रा.निलेश घोलप यांनी केले.
यावेळी बोलताना समतावादी सांस्कृतिक चळवळीचे उपाध्यक्ष प्रा.प्रकाश नाईक म्हणाले,अण्णाभाऊ साठे व सावित्रीमाई फुले यांनी मांडलेला समतेचा विचार सर्वांनी समजून घेतला पाहिजे.तर अध्यक्षस्थानावरुन बोलताना डाॕ.भानुदास गाडवे म्हणाले,नव्या पिढीने समतेचा विचार अंगिकारुन आपल्या कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत .
यावेळी गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयाच्या डाॕ.सौ. स्मिता सुरेश गिरी यांनी मा.सावित्रीबाई फुले ह्या फक्त नाव राहिल्या नसून समस्त स्त्री वर्गासाठी आदर्श सकारात्मक विचारधारा बनल्या आहेत व सावित्रीबाई फुले या आमच्यासाठी विद्येची देवता बनल्या आहेत या कारणामुळे त्यांच्या अंगी असलेले संस्कार, धैर्य, कष्ट चिकाटी हे गुण आजच्या व पुढील सर्व पिढ्याना मार्गदर्शनपर राहील, ही कधीही न थांबणारी सकारात्मक विचारधारा आहे असे मत मांडले.
कृषीअधिकारी काव्यश्री घोलप,शाहूवाडीच्या माजी उपसरपंच सरीता कवळे,डाॕ.धनश्री रोडे,डाॕ.माधवी यमगर,प्रा.भाग्यश्री कांबळे,सुनिता आपटे,गीता जाधव ,दिपाली काळे,प्रा.सुलोचना मोहिते ,मनिषा कोळेकर यांच्यासह कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राजेंद्र सणगर,राजेंद्र शिंगे ,हणमंत कवळे यांच्यासह महिला ,ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन मनिषा पाटील यांनी केले तर आभार प्रा.ज्योती थोरात यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button