Lonand

लोणंद शहरांमध्ये ग्रामस्थांना दुषित पाणी पुरवठा नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

लोणंद शहरांमध्ये ग्रामस्थांना दुषित पाणी पुरवठा नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

दिलीप वाघमारे

लोणंद शहरांमध्ये पाणीपुरवठा दुषित ग्रामस्थांना मिळत आहे त्या निषेधार्थ 26 जानेवारी 2020 रोजी नगरपंचायती वरसुलेमान कच्ची यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा लोणंद शहरामध्ये गेले अनेक दिवस नगरपंचायतीच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने रोगराईला बळी पडून साथीचे आजार बनवतात गोरगरीब झोपडपट्टीधारकांना नित्याचा त्रास आहे उच्च कुटुंब फिल्टर पाणी करून किंवा पाण्याचा जार घेऊन पर्याय शोधतात परंतु नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तहसीलदार आधी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली परंतु पर्याय न निघाल्याने 26 जानेवारी रोजी नगरपंचायत वर मोर्चा काढण्यात येऊन निषेध केला जाणार आहे.

लोणंद शहरांमध्ये ग्रामस्थांना दुषित पाणी पुरवठा नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

शहरात अनेक संघटना पक्षाचे पदाधिकारी याप्रकरणी आवाज उठवत नाही पालकमंत्र्यांनी व जिल्हाधिकारी तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने स्वच्छ पाणीपुरवठा कामी ठोस भूमिका घेऊन लोणंद कराना स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे सध्या गॅस्ट्रो सारखे रोग होऊन बालकांपासून ज्येष्ठ नागरिक पर्यंत मानसिक त्रास पाण्यामुळे होत आहे तरी याकडे कोणीही लक्ष देत नाही तरी नगरपंचायती ला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाण्याची चाचणी करून योग्य तो निकष निघणे गरजेचे आहे व नीरा नदी मधील पाण्याचा जोक वेल शेजारी निळसर पाणी आहे ते शुद्धीकरण होणे महत्वाचे आहे व गोटे माळ येथील पाण्याच्या टाकीच्या आवारात शहरातील टाकलेला कचरा बाबत अनेक न्यूजने आवाज देऊन सुद्धा स्वच्छता मोहीम हाती न घेतल्याने नगरपंचायतीचे वाभाडे निघत आहे अनेक ग्रामस्थ निमूटपणे अन्यायाला बळी पडत असल्याने कच्ची यांनी 26 जानेवारी रोजी निषेध मोर्चाचे आयोजन केले असून याबाबत सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना निवेदन पाठवले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button