लोकराज्य जनता पार्टीची विचारधारा तळागाळापर्यंत रुजवावी – अनिल चव्हाण
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : लोकराज्य जनता पार्टीच्या चार शाखांचे उत्साहात उद्घाटन . गरुडभरारी प्रतिनिधी: सर्वसामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून लोकराज्य जनता पक्षाची वाटचाल सुरू आहे . सध्या वाढती महागाई, बेरोजगारी तसेच कृषी ,उद्योग,व्यापार, शिक्षण ,आरोग्य आदी क्षेत्रात अनेक प्रश्न भेडसावत आहेत.पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेला भेडसावणारे विविध प्रश्न हाती घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन लोकराज्य जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी केले. रविवार दिनांक 14 मार्च रोजी पक्षाच्या सुभाषनगर, शाहू टोल नाका ,तावडे हॉटेल, शिवाजी पुल येथील चार शाखाफलकाचे उद्घाटन उत्साहात झाले . यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना अनिल चव्हाण बोलत होते. उपस्थित कार्यकर्त्यांचे स्वागत पक्षाचे संघटक अमोल कांबळे यांनी केले.यावेळी कोल्हापूर शहर सरचिटणीस सर्जेराव भोसले ,हिंदुराव पोवार,अशोक तोरसे , शहर संघटक संतोष बिसूरे, शशिकांत जाधव, हातकणंगले तालुका सरचिटणीस किशोर सातपुते, पन्हाळा तालुका सरचिटणीस संतोष खोत,बाळासो गवळी ,मनोहर कुराडे, विश्वनाथ पाटील,राहुल घोटणे,अभिजित पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.






