Chandwad

चांदवडला जनता कर्फ्युबाबत संमिश्र प्रतिक्रिया

चांदवडला जनता कर्फ्युबाबत संमिश्र प्रतिक्रिया

उदय वायकोळे चांदवड

चांदवड : चांदवड शहरातील सोशल मीडियातील काही ग्रुपवर कालपासून शहरात 3 एप्रिल ते 11 एप्रिलपर्यंत जनता कर्फ्यु लावण्यात आल्याच्या पोस्ट शेयर केल्या जात होत्या. प्रशासनाने अधिकृत कोणतीही घोषणा केलेली नसल्याने अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
काल दि 1 एप्रिल 2021 रोजी सोमवार पेठेतील व्यापारी श्री विशाल शांतीलाल ललवाणी व इतर काही व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने चांदवड तालुक्याचे तहसीलदार श्री प्रदीप पाटील साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की मुंबई,पुणे औरंगाबाद येथेही रुग्ण आहेत मात्र तेथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत,तसेच चांदवडला असावेत.आज सरकारी दवाखान्याची अवस्था काय झाली आहे,पॉझिटिव्ह रुग्ण घरी न ठेवता कोविड सेंटरला ठेवावीत म्हणजे रुग्णसंख्या कमी होईल.गावात डास मच्छर झाले आहेत,धुळीचे साम्राज्य आहे याकडे लक्ष दिले पाहिजे.लॉकडाऊन करण्यापेक्षा आपले नियंत्रण कठोर करा असेही निवेदनात म्हटले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button