Motha Waghoda

मोठा वाघोद्यात अखेर कोरोना संक्रमित अहवाल येताच अदृश्य सरपंचांनी दिली ग्रामपंचायतीला तासभराची दस्तक

मोठा वाघोद्यात अखेर कोरोना संक्रमित अहवाल येताच अदृश्य सरपंचांनी दिली ग्रामपंचायतीला तासभराची दस्तक

उपाय योजनांबद्दल अज्ञभिन्न बोलण्यासही नकार

विद्यमान उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी यांनी उपाय योजनांची घेतली हमी गावांतील सर्व घटकांना सोबत घेऊन कोरोनाशी लढण्याचे दिले आश्वासन

प्रतिनिधी मुबारक तडवी

लोकनियुक्त सरपंच यांचे निष्क्रियतेबद्दल गैरहजेरी, बेजबाबदारपणा बाबत गावकर्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य पदाधिकारी यांत तिव्र रोष व्यक्त होताना दिसला भारतासह जगभरात कोरोना संक्रमणाने थैमान घातलेले असताना ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला मारलेली दांडी व बेजबाबदारपणासह कर्तव्यात कसूर जबाबदारी झटकत जाणूनबुजून हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले व कोरोना मुक्त गावास कोरोना संक्रमित करण्यास कारणीभूत ठरलेले आहेत मोठा वाघोदा तालुका रावेर या गावात ८ जून पावेतो एक ही कोरोना संक्रमित रुग्ण सापडले नव्हते मात्र दि.९ जून रोजी मोठा वाघोदा येथील रजा कॉलनी तील एका ५२ वर्षिय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने निर्धास्त सरपंच व ग्रामविकास अधिकारी प्रशासन खळबळून जागे झाले आहेत त्याच धर्तीवर ग्रामपंचायतीला वार्यावर सोडत बेजबाबदारपणा कर्तव्यात कसूर करीत निष्क्रिय कर्महीनतेची सीमा पार केलेल्या व बाहेरगावी रहिवास (अकलूज भुसावळ) केलेले लोकनियुक्त सरपंच यांनी आज ग्रामपंचायतीस तासभरापुरती हजेरी दिली मात्र गावातील पुढील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत विचारलं असता त्यांनी बोलण्यास नकार देत उर्मट भाषेत *मग का मी का तुमच्या करिता ग्रामपंचायतीतच बसून राहू का* या उपकारात्मक उत्तर देत ग्रामपंचायतीतून निघून गेले तेव्हा उपस्थित विद्यमान उपसरपंच लक्ष्मीकांत बाजीराव चौधरी यांनी ग्रामपंचायत सदस्य नितीन सुपे,कालू मिस्तरी,संजय माळी, मुबारक उर्फ राजू तडवी,विशाल पाटील,हर्षल पाटील आदी सह ग्रामस्थांना सोबत घेऊन कोरोनाशी लढण्याचे बळ दिले तसेच ग्रामपंचायत तर्फे संक्रमित परिसरात हायड्रो क्लोनाराईड औषधांची फवारणी करण्यात आली आहे तसेच अर्सेनिक अल्बम ३० या होमियोपेथिक औषध घरोघरी वाटप केले जात असल्याचे ही उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी यांनी सांगितले मात्र मोठा वाघोदा वासियांच्या जिवाची काही एक पर्वा, सोयरसुतक नसलेल्या निष्काम सरपंच यांचे निष्क्रियतेबद्दल ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सह ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करीत कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी जळगांव यांचेसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा पदाचे महत्त्व व जबाबदारी न पेलवणार्या कर्तव्याशुन्य लोकनियुक्त सरपंच यांना पदमुक्त करावे अशी मागणी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सह ग्रामस्थांतून करण्यात आली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button