Erandol

एरंडोल येथे यंदा सर्व गणेश मंडळांचा पोलीस प्रशासनाच्या आवाहनानुसार मुर्ती दान करण्याचा आदर्श संकल्प

एरंडोल येथे यंदा सर्व गणेश मंडळांचा पोलीस प्रशासनाच्या आवाहनानुसार मुर्ती दान करण्याचा आदर्श संकल्प

एरंडोल येथे यंदा सर्व गणेश मंडळांचा पोलीस प्रशासनाच्या आवाहनानुसार मुर्ती दान करण्याचा आदर्श संकल्प

एरंडोल रजनीकांत पाटील

एरंडोल पोलीस स्टेशनच्या वतीने तसेच नगरपालिका प्रशासनाच्या वतीने काल दिनांक २०रोजी एरंडोल येथील नगरपालिकेच्या सभागृहात सर्व गणेश मंडळ तसेच शांतता समिती सदस्यांच्या गणेशोत्सव साजरा करण्याच्या संदर्भात झालेल्या मॅरेथॉन बैठकीत पोलीस स्टेशनचे पीआय स्वप्नील उनवणे यांनी मांडलेल्या कल्पनेनुसार आवाहनानुसार उपस्थित सर्व गणेश मंडळांनी यंदाच्या वर्षी कोरोणा च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या गणेश उत्सवाच्या बाबतीत आपल्या यंदाच्या होणाऱ्या विसर्जनाच्या संदर्भात अभिनव आदर्श निर्णय घेत गणेशोत्सवाच्या माध्यमातून कोरोणा विषयक जनजागृती, रँडम टेस्ट तपासणी, आणि प्रशासनाच्या आवाहनानुसार गणेश मंडळांनी स्थापन केलेल्या मूर्ती दान करण्याचा स्तुत्य व अनुकरणीय निर्णय घेतला आहे. या मॅरेथॉन बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांत विनय गोसावी होते. व्यासपीठावर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी, नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी ढमाळ साहेब, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विजय अण्णा महाजन, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा एरंडोल नगरीचे माजी नगराध्यक्ष किशोर भाऊ निंबाळकर, माजी नगर अध्यक्ष रवींद्र अण्णा महाजन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जगदीश ठाकुर, भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष अशोक भाऊ चौधरी, माजी नगराध्यक्ष राजू आबा चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रवींद्र पाटील, शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना राज्य समन्वयक तथा राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सामाजिक शैक्षणिक कार्यकर्ते किशोर पाटील कुंझरकर, नगरसेवक कुणाल महाजन, प्रमोद महाजन , डॉक्टर प्रतिनिधी डॉक्टर सुधीर काबरा, भाजपा चे प्रशांत महाजन, सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष आदीसह सर्व शांतता समितीचे सदस्य आणि सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष प्रतिनिधी फिजिकल डिस्टन्स चे सर्व नियम पाळून उपस्थित होते. उपस्थितांची समयोचित भाषणे झाली. सर्वांनी covid-19 कोरोणाच्या पार्श्‍वभूमीवर लोकहिताच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत मिरवणूक व इतर बाबींना फाटा देण्याचा संकल्प करीत प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रांत विनय गोसावी यांनी कोरोणा काळात येत असलेले अनुभव मांडून सर्वांनी आरोग्याच्या दृष्टीने स्वतःच स्वतःच्या रक्षक होऊन होऊन काळजी घेणे तसेच उत्सव काळात आपल्यामुळे दुसऱ्याच्या आरोग्यास बाधा पोहोचणार नाही यासाठी मास्क वापर आणि शासनाने विहित केलेले सर्व नियम आरोग्याच्या दृष्टीने पालन करणेगरजेचे असल्याचे म्हटले.यावेळी त्यांनी अनेक प्रसंग पोटतिडकीने मांडून तसेच गोष्ट व दाखले देत सर्व उपस्थितांची मने जिंकली. प्रास्ताविकातून पोलीस स्टेशनचे पीआय स्वप्नील उनवणे यांनी गृह विभागाचे गणेशोत्सवाच्या संदर्भात प्राप्त झालेल्या परिपत्रकाच संपूर्ण निर्णयाचे वाचन करून सर्व बाबी सर्व गणेश मंडळांना समजून सांगितल्या. व आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या. तसेच विसर्जनाचा बाबतीत सर्व गणेश मंडळांना आश्वासित करून स्वतः पोलिस स्टेशनचे सर्व सहकारी विधीवत धार्मिक पद्धतीने सर्व गणेश मंडळांचा विसर्जन विधी पार पाडू असे म्हटले. यावेळी पुढे बोलताना त्यांनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विखरण,खेडी सर्व ग्रामीण भागातील गावांमध्ये एक गाव एक गणपती घराघरात गणपती बस वण्याचा निर्धार प्रशासनाच्या आवाहनानंतर नागरिक करत असल्याचे म्हटले. नगरपालिकेच्या वतीने विसर्जनासाठी ट्रॅक्टर गणेश मंडळाच्या पर्यंत वेळेवर पोहोचवू अस आश्वासन लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी या अभिनव उपक्रमास संदर्भात बोलताना म्हटले. आणि ग्वाही सर्व नगरसेवकांच्या वतीने दि ली.

माजी नगराध्यक्ष राजू आबा चौधरी अशोक भाऊ चौधरी , किशोर भाऊ निंबाळकर,विजय अण्णा महाजन , रवींद्र अण्णा चौधरी,जगदीश ठाकुर, किशोर पाटील कुंझरकर,आदींसह अनेकांनी या वेळी आपल्या मनोगतातून एरंडोल शहर हे सर्व सण उत्सव व परंपरेत एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांच्या बाबतीत सहकार्य करून शांततेचं प्रतीक असल्याचे म्हटले . सर्व जणांची गणेशावर श्रद्धा असून गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर एरंडोल कर यांनी प्रशासनाच्या सोबत येऊन घेतलेला हा निर्णय एरंडोलकरांच्या दृष्टीने अभिमानाचा व गौरवाचा तसेच राज्यात जिल्ह्यात सर्वत्र अनुकरणीय एरंडोल पॅटर्न मानला जात आहे. एरंडोल शहराने संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात या माध्यमातून एक आदर्श संदेश दिला आहे. सहा ते तब्बल साडेआठ वाजेपर्यंत चाललेल्या या मॅरेथान बैठकीत सर्वच गणेश मंडळांनी प्रतिक्रिया देत प्रशासनासोबत कोरोणाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करण्याचा व साथ देण्याचा निर्णय जाहीर केला.याप्रसंगी पोलीस स्टेशन चे पोना अकील मुजावर, संदीप सातपुते आणि ग्रुह रक्षक यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नगरपालिकेचे अधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन सपोनि तुषार देवरे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button