चाळीसगांव येथील चार वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या लिंगपिसाट नराधमास फाशीची शिक्षा द्या..अन्याय अत्याचार निर्मुलन समितीची मागणी
वरील विषयांन्वये आपणांस अन्याय अत्याचार निर्मुलन समिती (रजी.) या सामाजिक संघटनेच्या वतिने निवेदन देत आहोत की,
चाळीसगांव या ठीकाणी चार वर्षीय अल्पवयीन चिमुरडीवर लिंगपिसाट नराधम सावळाराम भानुदास शिंदे वय २६ याने अत्याचार करुन मानवतेला काळीमा फासण्याचा निंदनीय प्रकार केला असुन पीडित चिमुरडी उपचारार्थ रुग्णालयात दाखल असुन तिची प्रकृती गंभीर असून अशाप्रकारच्या राक्षसी कृत्य करणारया नालायकास फाशीची शिक्षा होण्यासाठी सदरचा खटला जलदगती न्यायालयात त्वरीत सुरु करावा व या खटल्यात विषेश सरकारी वकील यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती चे प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांचे आदेशानुसार आम्ही नासिक जिल्हा व मनमाड शहर कार्यकारिणीच्या वतिने आपणांस देत असुन या गंभीर प्रकरणाचा आम्ही समिती तर्फे तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहोत.
आमच्या भावना महाराष्ट्र शासनास कळविण्यात याव्यात या करीता हे निवेदन देण्यात येत आहे.
अ.अ.नि.स.जिल्हा युवक अध्यक्ष (पिंटू)विकास वाघ .सुरेखा ढाके. शिलाताई सांगळे. जोति ठाकूर.रोहिणी वाव्हळ.विजय सोनवणे. स्वराज वाघ.सोनाली निकम. ललिता जामधाडे.संगीता कांबळे.या सर्वांनी निवेदनाद्वारे आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.






