धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांच्या पाठ पुराव्यातून केशरी कार्ड धारकांना मिळणार अन्नधान्याचा लाभ…
लाँकडाऊनच्या काळात आमदार फारूक शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांच्याकडे पाठपुरावा करत धुळेकर नागरिकांना अन्न धान्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला होता…
असद खाटीक
धुळे शहरातील अनेक गोर गरीब व सर्व सामान्य तसेच दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना त्यांच्या शिधापत्रिकेवर शासनाकडून मिळणारे अन्नधान्य बऱ्याचश्या त्रुटी असल्याने मिळत नाही. धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या पिवळ्या व केशरी शिधा पत्रिका जीर्ण व खराब झाल्या आहेत त्यामुळे किंवा शिधापत्रिकेत कुटुंबांतील इतर सदस्यांची नावे समाविष्ट न झाल्याने तसेच आधार सीडिंग न झाल्याने मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्य दुकानातून अन्न-धान्य उपलब्ध होत नाही. रेशन दुकानातून अन्नधान्य घेणारा शिधापत्रिका धारक हा गरीब व अशिक्षित असल्याकारणाने काही स्वस्त धान्य दुकानदार असमाधानकारक उत्तर देऊन आधार सीडिंग व इतर कारणे सांगून रेशन देण्याचे टाळतात. यासर्व त्रासाला कंटाळून नागरिकांनी आमदार कार्यालयात खास करून महिलांनी विविध भागातुन शिष्ट मंडळ, मोर्चे आणून आपल्या मागण्या धुळे शहर आमदार फारूक शाह यांच्याकडे लाँकडाऊनच्या काळात व आधीपासून केल्या होत्या. लाँकडाऊनच्या काळात देखील आमदार फारूक शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व अन्न नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भूजबळ साहेब यांच्याकडे पाठपुरावा करत वस्तुस्थिती मांडत धुळेकर नागरिकांना व गोर गरीब कष्टकरी जनतेला अन्न धान्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला होता.
याच बाबतीत आमदार फारूक शाह यांनी त्यांच्या आमदार कार्यालयात २३८६ शिधापत्रिका व अपडेट असलेले आधार यांच्या छायांकित प्रती जमा केल्या होत्या व त्या तहसील कार्यालय धुळे यांच्याकडे जमा केल्या होत्या. याचा पाठपुरावा जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच तहसीलदार धुळे यांच्याकडे मागणी लावून धरत तहसीलदार यांच्याकडून आजतागायत २३८६ पैकी एकूण १८५० प्रस्तावांवर कामकाज झाले असून १६१८ प्रकरणातील शिधा पत्रीकाधारकाचे आधार सिडींगचे कामकाज तपासून त्याची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सदर प्रकरणात अन्नधान्य मिळणेकामी शासन निर्णयानुसार संबंधीत रेशनकार्ड धारकांना उत्पन्न दाखला व हमीपत्र आवश्यक असल्याने त्यांनी लवकरात लवकर संबधित शिधापत्रिकाधारकांनी सादर केलेले नसल्याने आप आपल्या स्वस्तधान्य दुकानदार यांचेकडे उत्पन्न दाखला व हमीपत्र जमा करावे. कार्यवाही पूर्ण झालेनंतर सदर अर्जावर लाभ मंजूर/नामंजूर करणेबाबत निर्णय घेणेबाबत कार्यवाही होईल व त्यानंतर इष्टांक मंजूर करून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष अन्नधान्याचा लाभ दिला जाणार आहे. तरी आमदार कार्यालय धुळे येथे कागदपत्रे जमा केलेल्या २३८६ शिधापत्रिका धारकांनी उत्पन्न दाखला व हमीपत्र संबधित शिधापत्रिका धारकांनी सादर केलेले नसल्याने त्यांनी आपआपल्या स्वस्तधान्य दुकानदार यांचेकडे उत्पन्न दाखला व हमीपत्र जमा करावे त्यांची यादी संबधित स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आली आहे.
कृपया प्रसिद्धीसाठी दि. ३०-०९-२०२०
आपला
निलेश काटे
जनसंपर्क अधिकारी तथा स्वीय सहाय्यक
आमदार, धुळे शहर






