Indapur

इंदापूर विधानसभे मध्ये कोणता उमेदवार विजय होणार यासाठी लागलेली पैजे ची रक्कम केली अदा

इंदापूर विधानसभे मध्ये कोणता उमेदवार विजय होणार यासाठी लागलेली पैजे ची रक्कम केली अदा

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

—इंदापूर— निवडणूकीच्या काळामध्ये कोणता उमेदवार विजयी होणार… कोणता उमेदवार पराभूत होणार यांच्या कार्यकर्त्यामध्ये अनेक पैजा लागत असतात. मात्र निवडणूकीचा निकाल झाल्यानंतर निकालाबरोबर पैजाचा ही विसर पडला जातो. मात्र इंदापूर विधानसभा निवडणूकीमध्ये लावलेली पैज जिंकल्यानंतर पैजेची रक्कम दिली असल्याची माहिती पैज जिंकणाऱ्या व्यक्तीनेच दिली आहे.

इंदापूर विधानसभेची निवडणूक चुरशीची झाली. विद्यमान राज्यमंत्री व दत्तात्रेय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यापैकी कोण विजयी होणार याकडे इंदापूर तालुक्यासह राज्याचे लक्ष लागले होते.जनतेमध्ये निवडणूकीच्या निकालीची उत्सुकता होती.तसेच भरणे व पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पैजा ही लावल्या होत्या. भरणे यांचे समर्थक कालिदास राऊत (कळंब) व पाटील यांचे समर्थक महेंद्र रेडके( इंदापूर) यांच्यामध्ये ११ हजार १११ रुपयांची पैज लागली होती.राऊत यांनी पैज जिंकल्यानंतर रेडके यांनी निवडणूकीच्या निकालानंतर पैजेची रक्कम आठ – दहा दिवसांनी परत दिली. गेल्या महिन्यामध्ये इंदापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी रेडके कुटुंबातील पुष्पा रेडके यांची निवड झाली आहे. राऊत यांनी रेडके कुंटूबाला सभापती पदाचा मान मिळाल्याबद्दल महेंद्र रेडके यांचा पुष्पगुच्छ देऊन नुकताच सत्कार केला.यावेळी विधानसभेच्या पैजेच्या एकमेंकांना आठवणी झाल्या. निवडणूकीपुरतेच राजकारण करुन इतरवेळी समाजकारण करण्याचा मनोदय राऊत व रेडके यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button