Amalner

जेष्ट अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांना खान्देश भूषण पुरस्काराने गौरवणार

जेष्ट अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांना खान्देश भूषण पुरस्काराने गौरवणार
अमळनेर प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ धुळे शाखा नाशिक च्या वतीने 15 रोजी नाशिक येथे अहिराणी कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून खान्देशातील साहित्यिकांना खान्देश भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे
कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक कीर्तनकार हभप प्रा चत्रभुज सोनवणे यांची निवड झाली असून खान्देशातील राजाभाऊ कुलकर्णी (धुळे), कृष्णा पाटील (अमळनेर ), सुनंदा वैद्य (धुळे), प्रभा बँकर (धुळे), प्रा वा ना आंधळे (जळगाव), प्रा तानसेन जगताप (चाळीसगाव), रामदास वाघ (धुळे), डॉ रमेश सूर्यवंशी (औरंगाबाद), कमलाकर देसले (झोडगे) आदींचा खान्देश भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे संमेलनाचे उद्घाटन राजेंद्र गोसावी स्वीय सहाययक मुंबई यांच्या हस्ते होणार आहे स्वागताध्यक्ष म्हणून शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन यांची निवड करण्यात आली आहे संमेलनाचे आयोजन केंद्रीय अध्यक्ष प्रा सदाशिव सूर्यवंशी व नाशिक च्या जिल्हाध्यक्षा सुनीता पाटील यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button