Aurangabad

आदर्श गाव पाटोदा येथे स्वखर्चाने सुरू करण्यात आले कोविड सेंटर

आदर्श गाव पाटोदा येथे स्वखर्चाने सुरू करण्यात आले कोविड सेंटर
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : आदर्श पाटोदा ग्रामपंचायतीने स्व:खर्चातून गावातील जिल्हा परिषद शाळेत सर्व सुविधांयुक्त कोविड केअर सेंटर स्थापन केले आहे. गावातील कोरोना रुग्ण व नातेवाइकांची गैरसोय थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीने हा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत असल्याने शहर व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची उपचारांअभावी परवड होत आहे.
तज्ज्ञांकडून कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची हेळसांड थांबविण्यासाठी सरपंच जयश्री दिवेकर, उपसरपंच कपिंद्र पेरे, ग्रामविकास अधिकारी पी. एस. पाटील, सदस्य लक्ष्मण मातकर, पूनम गाडेकर, बेबी पेरे, मंदा खोकड, मीरा जाधव, शामल थटवले, पुष्पा पेरे, सुनीता पेरे, छाया पवार यांनी गावात स्व:खर्चातून कोविड व क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button