रोहिणी गावात मोठ्या थाटात जय आदिवासी युवा शक्ती(JAYS) शाखेची स्थापना झाली.!
राहुल साळुंके धुळे
धुळे : आदिवासिंच्या संविधानिक न्यायहक्काबाबतीत जनजागृती, आदिवासिनच्या सर्वांगीण विकासाकरिता व त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात संविधानिक मार्गानी आवाज उठवून सोशित, पीड़ित समाजाच्या शेवटच्या रांगेत उभे असलेल्या शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहेत आणि आदिवासी समाजाचे युवा नेतृत्व तयार करण्यासाठी युवकांनी युवकांसाठी तयार केलेल वैचारिक संघटन जय आदिवासी युवा शक्ति (JAYS) म्हणून कार्यरत आहेत.
जय आदिवासी युवा शक्ति (जयस) सध्या देश भरात एकूण अकरा आदिवासी बहुल राज्यात व्यापक प्रमाणात काम करत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून शिरपूर तालुक्यातील रोहिणी गावात जय आदिवासी युवा शक्ती(जयस) शाखेची स्थापना करून फलक अनावरण करण्यात आले. जि.प.सदस्य श्री.कैलाशदादा पावरा व डॉ.हिरा पावरा यांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आले. ह्यावेळी सामजिक चळवळीला बळ मिळावे म्हणून युवकांना कार्यभार सोपवण्यात आले. यावेळी रोहिणी शाखेचे अध्यक्ष म्हणून शोभाराम पावरा, उपाध्यक्ष विनेश पावरा, उपाध्यक्ष विलास पावरा, सचिव रमेश पावरा , सहसचिव अनिल भील, मीडिया प्रभारी विकास पावरा, सहसचिव थावऱ्या पावरा, संघटन मंत्री जगदीश पावरा, कोषाध्यक्ष सुरेश पावरा, मीडिया प्रभारी रोहिदास पावरा,महामंत्री दिपक पावरा, मीडिया प्रभारी, अमिलाल पावरा, सदस्य राकेश पावरा, सदस्य, रमेश भील, सदस्य अंकित पावरा यांची नियुक्ति करण्यात आली. कार्यक्रम दरम्यान रोहिणी गावाचे पोलीस पाटील श्री. सुभाष पावरा, जयस महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.हिरा पावरा, जयस महाराष्ट्र प्रवक्ता आप.दिनेश पावरा, जयस शिरपूर तालुका अध्यक्ष भूपेश पावरा व अध्यक्षीय भाषण जि.प.सदस्य श्री. कैलास पावरा ह्यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. तसेच नवनिर्वाचित युवकाना नियुक्ती पत्र व जयसचा गमछा देऊन त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री.जि.प.सदस्य कैलाश पावरा होते तसेच डॉ.हिरा पावरा जयस उपाध्यक्ष महाराष्ट्र, प.स. सदस्य बागल्या दादा पावरा, पोलिस पाटील सुभाष दादा पावरा, आदर्श गाव सन्मानित सरपंच डॉ.आनंदराव पावरा, मुंबई जयसचे श्री.दिलीप ठाकरे सर जयसचे तालुका अध्यक्ष भूपेश पावरा, उपाध्यक्ष जगदीश पावरा, कार्याध्यक्ष मनोज पावरा, संपर्क प्रमुख शिवाजी पावरा, भोजू पावरा, दिनेश पावरा, वसंत पावरा, खेमा पावरासह तालुका जयस पदाधिकारी उपस्थित होते तर ह्यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन जयस शिरपूर तालुका उपाध्यक्ष श्री.राजेश पावरा सर ह्यांनी केले.






