Jalgaon

ना गिरीष महाजन यांना मराजीप आरोग्य कर्मचारी संघटने तर्फे निवेदन

ना गिरीष महाजन यांना मराजीप आरोग्य कर्मचारी संघटने तर्फे निवेदन

आज जामनेर येथे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार मा.गिरीशभाऊ महाजन यांना मराजीप आरोग्य कर्मचारी संघटना 257/89 चे जळगांव जिल्हाध्यक्ष सह जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी समवेत, आरोग्य कर्मचारी वर्गाचा दरमहा उशिराने होणाऱ्या वेतनासोबतच.. सर्व आरोग्य कर्मचारी हिताच्या मागण्यांसंदर्भात केंद्रीयअध्यक्ष-महेश जाधव, कोषाध्यक्ष-वैष्णव साहेब,यांचे व जळगांव जिल्हा कार्यकारिणी यांच्या निवेदनाचे पत्र प्रत्यक्ष मा.मंत्री महोदय यांना जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले, ग्रामविकास मंत्री महोदय मा.गिरीश भाऊ यांनी कर्मचारी वर्गाच्या मागण्यांचे संदर्भात सर्व प्रश्न शांततेत एकुण व समजुन घेतले तथा त्यांनी सर्व मागण्यांना सकारात्मक पणे प्रतिसाद दिला आहे. तद्नंतर मंत्री महोदय यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार केला.

प्रसंगी.. जिल्हाध्यक्ष-विजय देशमुख, कोषाध्यक्ष-प्रेमलता पाटील, सरचिटणीस-ज्ञानेश्वर पाटील, कार्याध्यक्ष-राजेशजी कुमावत, जुनी पेन्शन हक्क संघटन अध्यक्ष-राकेश शिंपी, सह सरचिटणीस-रवीकिरण पवार, सचिव कार्यव्यवस्थापक-कांतीलाल पाटील, जिल्हा संघटक-शीतल रोकडे निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button