Amalner

सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा प्रमुख विजयसिह पवार,शिक्षक ईश्वर महाजन उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा प्रमुख विजयसिह पवार,शिक्षक ईश्वर महाजन उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित…

सानेगुरुजी स्पर्धा परीक्षा प्रमुख विजयसिह पवार,शिक्षक ईश्वर महाजन उपक्रमशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

अमळनेर प्रतिनिधी-
अँड.मनोहर भांडारकर यांचे पू.पिताजी श्रीमंत भिकाजी शेठ भांडारकर यांचा स्मृतिदिन ५ सप्टेंबर ला असतो हा दिवस शिक्षक दिन सुध्दा असतो त्यांच्या स्मृति साठी श्री.मनोहर भि. भांडारकर व परिवार आदर्श शिक्षकांचा सत्कार करते.
असे प्रा.डॉ माधुरी भांडारकर यांनी सांगितले.
 यावर्षी देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूल मधील शिक्षक
 ईश्वर महाजन व शिरसाळे हायस्कुलचे
विजय पवार या दोघा आदर्श शिक्षकांचा
शाल,श्रीफळ व बुके,पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, उपाध्यक्षा प्रा.माधुरी भांडारकर, चिटणीस प्रकाश वाघ,सयुक्त चिटणीस सुमीत पाटील,विश्वस्त बापू नगांवकर,सदस्य भिमराव जाधव, सुमित पाटील, दिपक वाल्हे,प्रसाद जोशी,पी.एन.भादलीकर उपस्थित होते.
यावेळी सानेगुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष व संचालक मंडळाने शाल,बुके देऊन उपक्रमशील शिक्षक विजयसिंह पवार व ईश्वर महाजन यांचा सत्कार केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button