India

ओ शेठ चं व्हायरल तुफान…

ओ शेठ चं व्हायरल तुफान…

मुंबई : धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळा म्हणून जवळजवळ सगळेच लोकं सोशल मीडियावर लोक अॅक्टिव्ह आहेत.सतत काही न काही सोशल मीडियावर व्हायरल होत असतं यात अनेक गाणे,व्हिडीओ फोटो यांचा समावेश असतो.सध्या एक गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटस, इंन्स्टा फेसबूकच्या स्टोरीज वर हे गाणं पहायला मिळतयं “ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट’ हे च ते गाणं असून या गाण्याने प्रत्येकाला वेड लावलं आहे.
सध्या सोशल मीडियाच्या सर्व माध्यमांवर ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट’चा नाद लागलाय.. ह्या गाण्याचे बोल ही अर्थ पूर्ण आहेत.हे गाणं गायक उमेश गवळी यांनी म्हटलं आहे.
हे आहेत गीताचे बोल…
जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली
नावाला तुमच्या डिमांड आली
ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट
ओ शेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट…

ह्या गाण्यात अगदी साध्या शब्दांचा उपयोग केला असून आधुनिक काळात व्हायरल,ग्रेट,डिमांड,धोकेबाजी,नाद इ रोजच्या व्यवहारातील शब्दांचा उपयोग केला आहे.गीताचे बोल आणि संगीत संध्या प्रणिकेत यांनी दिल आहे.ह्या गाण्याच्या आधारे इतर जन जागृती पर गाणे व शॉर्ट व्हिडिओ तयार करून सोशल मिडिया वर व्हायरल केले जात आहेत. यात महागाई,पेट्रोल वाढ,बेरोजगारी इ विषयांचा समावेश आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button