चांपा येथील गरजू बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यास सरपंचांची आमदार सुधीर पारवे यांच्याकडे मागणी
चांपा प्रतिनिधी अनिल पवार
चांपा येथील गरजू बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करण्याकरिता सरपंच अतिश पवार यांची आमदार सुधीर पारवे यांच्याकडे मागणी केली .चांपा येथे १००पेक्षा जास्त युवक बेरोजगार असल्याने गरजू बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यास सरपंच अतिश पवार यांनी पुढाकार घेतला आहे .सरपंचांनी गावातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यास गावातील पन्नास पेक्षा जास्त युवकांसह आज सकाळी आमदार सुधीर पारवे यांच्या निवासस्थानी भेट दिली व गरजू बेरोजगार युवकाच्या समस्या मांडल्या असून बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी सरपंच अतिश पवार यांनी केली असता आमदार सुधीर पारवे यांनी सरपंचांची मागणी स्वीकारत चांपा येथील गरजू बेरोजगार युवकांना लवकरच रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
सरपंचाच्या पाठपुराव्याने गरजू बेरोजगार युवकांना लवकरच रोजगार मिळणार असल्याचे आमदारांनी सांगितले .यावेळी सरपंच व युवकांनी आमदार सुधीर पारवे यांच्या आश्वासन ला मान देत आभार मानले .








