जागर लस संबंधित जनजागृतीचा 6 वा टप्पा जे.जे.प्लस हॉस्पिटलच्या वतीने पूर्ण.
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : आज वरझडी व टाकळी ता.गंगापूर या गावात लस बद्दल समज गैरसमज भीती दूर करण्यात, जे.जे.प्लस टीम विशाल नवगिरे सर, विजयभाऊ लोदवाळ, मंगलसिंग सिंगल, यांच्या सर्व टीमने मार्गदर्शन केले, गावातील लोकांचे मनपरिवर्तन करण्यात या टीमला यश आले. गावातील लोकांच्या मनात अजूनही भीतीचे वातावरण आहे, वरझडी येथील नागरिक तर फार जास्त भीती बाळगतात, हे अनुभव या टीमला आले. काही म्हणतात माझे बायपास झाले, मग मी का घ्यावी. तर काही म्हणतात बाजूच्या गावात लस घेतली म्हणून ती व्यक्ती मरण पावली, सर्वच गावे किंवा नागरिक जागरूक झाले असे मुळीच नाही. असा काहींचा समज असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे, त्या सर्वांनी आमच्या टीमच्या सोबत येऊन बघावे.
वरझडी येथे सरपंच धनसिंगभाऊ जोनवाळ, मा.सरपंच मदनभाऊ सुंदर्डे, कैलासभाऊ सुलाने (पशुवैदकीय अधिकारी) पोलीस पाटील गावातील अंगणवाडी सेविका आशा वर्कर या सर्वांनी विशेष सहकार्य केले. आता पर्यंत 18 गावात ही टीम जाऊन पोहचली. गावातील नागरिकांशी संवाद साधू शकलो. शब्दांची देवाण घेवाण काही नागरिकांचे होते. त्याला समाधान कारक उत्तर या टीमने दिले, असा हा संवाद व मार्गदर्शन जे.जे.प्लसच्या वतीने करण्यात आले. जे नागरिक लस घेण्यास उत्सुक नव्हते किंवा भीतीचे वातावरण त्यांच्या मनात होते, त्यात खरे उतरले आणी त्यांचे मनपरिवर्तन करू शकले.
काही गावात डॉक्टर अधिकारी वर्ग राजकीय पोलीस डिपार्टमेंट नगर परिषद (CO) RTO अधिकारी यांनी मार्गदर्शन नागरिकांना केले. नेहमीसाठीच संपर्कात राहण्यासाठी ही अमूल्यभेट या निमित्ताने झाली. हा कार्यक्रम बदनापूर तालुका राजेवाडी, खोडावाडी, सागरवाडी ते कन्नड, वैजापूर, गंगापूर एकुण चार तालुख्यातील 18 गांवात 10 हजार लोकांना लस बद्दल अमूल्य अस मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख डॉक्टर जीवन राजपुत (जे.जे.प्लस हॉस्पिटल). दिनेशभाऊ परदेशी (नगर अध्यक्ष वैजापूर) भागवत बिघोत सर (मुख्याधिकारी वैजापूर) विक्रमसिंग राजपुत (ठाणेदार वैजापूर) सुजित राजपुत (RTO नागपुर) महिपालसिंग चांदा (रिटायर्ड DYSP) पूनमदादा डोंगरजाळ (तलाठी) तसेच या कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन मंगलसिंग सिंगल (सामाजिक कार्यकर्ते J.J.Plus.Co-Ordinater Head, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना मराठवाडा अध्यक्ष) विशाल नवगिरे (J.J.Plus) विजय लोदवाळ (J.J.Plus) या टीमने मार्गदर्शन केले.






