Faijpur

आजपासून फैजपूर मध्ये कृषिधन कृषी प्रदर्शन

आजपासून फैजपूर मध्ये कृषिधन कृषी प्रदर्शन

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका यावल

सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र पाल तर्फे कृषिधन कृषी प्रदर्शन लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या मैदानावरती आयोजित करण्यात आलेले आहे सदर प्रदर्शन हे 4 फेब्रुवारी पासून 6 फेब्रुवारी पर्यंत सर्वांसाठी मोफत खुले आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा या प्रदर्शनामध्ये शेतकरी ,शेतकरी कंपन्या ,महिला बचत गट व कृषी निविष्ठा निर्माण करणाऱ्या कंपन्या विविध कृषी विषयक कंपन्या सहभागी होणार आहेत ते आपल्याकडे असलेल्या तंत्रज्ञानाचा प्रात्यक्षिके प्रदर्शन स्थळावर करून दाखवणार आहेत या प्रदर्शनात सुमारे 150 स्टालचे आरक्षण झालेले आहे खानदेश मधील तयार होणाऱ्या खाद्य पदार्थांची विक्री करणारे उपहारगृह देखील प्रदर्शन स्थळी असणार आहे तसेच चार फेब्रुवारीला भरड धान्य मिशन चा प्रसार व्हावा यासाठी मिलेट मिशन दौड( मॅरेथॉन स्पर्धा)आयोजित करण्यात आलेली आहे प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार दिनांक 4 2 2023 रोजी दुपारी तीन वाजता आपल्या रावेर यावल तालुक्याचे आमदार श्री शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या शुभहस्ते होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हवामान तज्ञ माननीय श्री पंजाबराव डख हे उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तसेच या कार्यक्रमाला उद्घाटन प्रसंगी माननीय श्री अमन मित्तल जिल्हाधिकारी जळगाव माननीय श्री पंकज आशिया ,मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री संभाजी ठाकूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव हे उपस्थित राहणार आहेत पिकावर ती फवारणीड्रोन द्वारे कशी केली जाते याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक 6 फेब्रुवारी 2023 ला आयोजित केलेले आहे शेती व शेतकरी या विषयावरती रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये रोख बक्षीस तसेच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच केळीचे घड स्पर्धा या ठिकाणी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेली आहे तरी ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतातील घड या ठिकाणी आणायचे असतील त्यांना या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेता येईल दिनांक 5 फेब्रुवारी रोजी महिलांसाठी भरड धान्य पाक कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button