जयसिंगराव तलाव पुन्हा तुडूंब भरून वाहू लागला.
कोल्हापूर -सुभाष भोसले
कागल येथील जयसिंगराव तलाव पाण्याने भरून तुडूंब भरून दुसऱ्यांदा वाहू लागला आहे.छत्रपति शाहू महाराज यांच्या काराकिर्दात पिराजीराव बापूसाहेब घाटगे ,कागलकर हे अल्पवयीन असताना तलावाचे काम पूर्ण झाले.तलावाच्या कामाची सुरवात 1 एपिल 1892 मध्ये झाली व हा तलावाचे बांधकाम 10 ऑगस्ट 1894 मध्ये पूर्ण झाले.या तलावाला त्यावेळी एकूण 192000 रूपये खर्च आला.या तलावाचे पाण्याचे एकूण क्षेत्र 76 एकर 28 गुंठे आहें .कच्चा बंधारा 1660 फूट आहे तर पक्का बंधारा 150 फूट आहे हा तलाव 1948 मध्ये कागल नगरपालिकेस हस्तातंरीत करणेत आला.ब्रिटीश कालावधीत बांधलेला हा तलाव मजबूत असून हा यावषी पूर्ण भरला आहे हा तलाव बघणेसाठी सर्व कागलकर येत आहेत.
हा तलाव कागलमधील महत्वाचे प्रेक्षणीय स्थळ असून हा तलाव पुन्हा भरल्यामुळे लहान मुले या ठिकाणी पाण्यात भिजत आहेत.आनंदाने बागडत आहेत वडिलधारी मंडळी तो पाहणेसाठी पुन्हा येत आहेत.कोल्हापूरातील पर्यटक हा तलाव पाहणेसाठी गर्दी करत आहेत.






