पंढरपूर

स्वेरीत लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

स्वेरीत लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

रफिक अतार

पंढरपूर-गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन फ्री लान्सर डॉ. कमल गलानी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी लोहपुरूष सरदार पटेल यांच्या जीवनाचे महत्व सांगून त्यांच्या कार्यातील विविध पैलू उलगडताना ‘समाज कार्य असो अथवा राजकारण असो ‘राष्ट्रीय एकात्मता’ आणि ‘सरदार पटेल’ यांच्यात कधीच अंतर पडत नव्हते. म्हणून सरदार पटेल यांचे कार्य भारतवासियांनाच नव्हे तर जगातील जनतेला खूप महत्वाचे वाटते.’ असे सांगून काश्मीर आणि भारत यांच्यातील राष्ट्रगीताचे महत्व पटवून देवून अखंड भारतासाठी सरदार पटेलांनी केलेल्या योगदानाचे महत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला पटवून असल्याचे सांगितले. डॉ. गलानी यांनी देखील सरदार पटेल यांच्या जीवनातील काही घटना सांगितल्या. यावेळी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्त स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘राष्ट्रीय एकता दिवस’ निमित्त राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली. प्रतिज्ञेचे वाचन विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी केले. यावेळी संत दामाजी महाविद्यालयाचे प्रा. जाधव, स्वेरीचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते, कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. भुवनेश्वरी मेलिनामठ, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागप्रमुख डॉ. सचिन सोनवणे, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागप्रमुख डॉ. दीप्ती तंबोळी, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन वैष्णवी मोरे यांनी केले तर आभार सचिन इंगळे यांनी मानले.

स्वेरीत लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरीछायाचित्र- १. भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची स्वेरीत जयंती साजरी करण्यात आली यावेळी डावीकडून डॉ. कमल गलानी, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी.

स्वेरीत लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी२. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकतेची शपथ घेताना स्वेरीतील विद्यार्थी सोबत स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार प्राध्यापका वर्ग व विद्यार्थी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button