प्रोराईज (नागाआर्जुन) कंपनी तर्फे शेतकऱ्यांना माहिती
महेश हुलसूरकर कर्नाटक
कर्नाटक : कोंगळी येथील प्रगतीशील शेतकरी भगवान दिलीप डांगे याच्या शेतात प्रोराईज (नागाआर्जुन) कंपनीच्या वतीने परिसरातील शेतकऱ्यांना विविध टोमॅटो, टरबूज, मिरची, दाळींब आदी कशा पद्धतीने लागवड करून खताची मात्रा व फवारणी केव्हा व कशी करावी या संदर्भात माहिती दिली.
यावेळी बोलताना डॉ काझी यांनी आपली शेती ही पुर्वजा पासून करीत आहेत पण आता या शेतात विविध फवारणी करून शेतातील कस हा कमी झाला आहे त्यामुळे शेतात माल हा कमी होताना दिसत आहे शेतात प्रोराईज(नागाआर्जुन)कंपनी कडील विविध खत बी व फवारणी केल्याने पीकासाठी चांगले आहे.
यावेळी उपस्थित एकनाथ कारभारी, गोविंदराव कालीदास सातभाई, भागवत कारभारी, चाँदशेख, एल.डी.बगदुरे, नागनाथ बगदुरे, बाबुराव चांदीवाले, बलवंत होनानाईक,योगाजी कारभारी आदी हुलसूर, दापका, देवनाळ, मेहकर येथील शेतकरी उपस्थित होते.






