Amalner

भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव मा. प्रियांकाजी सानप यांनी अमळनेर येथील जागृत देवस्थान मंगळदेव ग्रह मंदीरास भेट

भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव मा. प्रियांकाजी सानप यांनी अमळनेर येथील जागृत देवस्थान मंगळदेव ग्रह मंदीरास भेट

Amalner : आज मंगळवार दि 1 डिसेंबर रोजी भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव मा. प्रियांकाजी सानप यांनी अमळनेर येथील जागृत देवस्थान मंगळदेव ग्रह मंदीरास भेट दिली. यावेळी मंगळग्रह मंदीर संस्थानाचे अध्यक्ष मा. डिगंबरजी महाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानाच्या संचालक मंडळातील एस.एन.पाटील, एस.बी.बावीस्कर , दिलीप बहिरम, गिरीश कुळकर्णी, अनिल अहिरराव, राहुल बहिरम आदी मान्यवरांनी मंदीराचे वैशिष्ट्य सांगून संपुर्ण मंदीर परिसराची सानप यांना ओळख करून दिली. यावेळी मंदीर परिसरातील शांतता, स्वच्छता, शिस्त आणि प्रसन्न वातावरण पाहुन सानप अवाक् झाल्या . त्यांनी संपुर्ण मंदीर परिसर फिरुन सर्व संस्थान विकासासाठी कार्यरत असलेल्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले. सानप यांनी मंगळदेवांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचाही आस्वाद घेतला. सानप यांच्या स्वागतासाठी जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा हितेशदादा पाटील, जळगाव विधानसभा युवक अध्यक्ष पराग घोरपडे, जळगाव ग्रामीण विधानसभा युवक अध्यक्ष किरण पाटील, दिग्विजय पाटील, जळगाव जिल्हा युवक काँग्रेस सचिव हर्षल जाधव, अमळनेर तालुका काँग्रेस चे अध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष नगरसेवक मनोज पाटील, प्रभारी तालुकाध्यक्ष बी.के.सुर्यवंशी,अमळनेर काँग्रेस अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष जुबेर पठाण, अल्पसंख्याक विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष अझहर सय्यद, अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, शहरकार्याध्यक्ष कुणाल चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button