इंदापूर शहराच्या विकासासाठी मिळणार 10 कोटी – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
“मालोजी राजे यांची गढी उभारण्यासाठी शासनाचा निधी हवा “
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: माझ्या राजकीय प्रवासात इंदापूर शहराने कायमचा मताचा टक्का अधिक देत मला साथ दिली आहे. संपूर्ण शहर माझ्या पाठीशी भक्कमपणे मोठ्या ताकदीने उभे आहे. यासाठी इंदापूर शहराच्या विकासासाठी जेवढा निधी लागेल तितका निधी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासाठी मी मोठ्या ताकदीने प्रयत्न करिन अशी ग्वाही जलसंधारण सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरुन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा,उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, नगरसेवक गजानन गवळी,अमर गाडे,अनिकेत वाघ,पोपट शिंदे,स्वप्निल राऊत,ताहिर मोमीन,अनिता धोत्रे,जगदीश मोहिते,माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस,वसंत माळुंजकर,श्रीकांत स्वामी,जावेद शेख,नितीन मखरे, बाळासाहेब ढवळे,रोटरी क्लबचे अध्यक्ष राकेश गानबोटे, युवा क्रांती प्रतिष्ठानचे प्रशांत सिताप यांच्यासह नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्तात्रय भरणे म्हणाले की,इंदापूर शहराच्या वैभवात वाढ व्हावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून टाऊन हॉल उभारणीसाठी निधी देण्यात आला होता.मात्र याचे काही प्रमाणात सुशोभिकरण रखडलेले आहे यासाठी माझ्या स्वतःच्या आमदार फंडातून 50 लाखाचा निधी दिला जाईल.यामुळे या शहरातील गोरगरीब कुटुंबातील विवाह सोहळे,लहान मोठे कार्यक्रम याच टाउन हॉलमध्ये पार पडतील शिवाय सामाजिक कार्यासाठी याचा उपयोग ही होईल.मात्र इंदापूर शहरात कोणत्याही प्रभागात निधी देताना दुजाभाव न करता शासनाचे प्रतिनिधी म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी सोईस्कर काम करुन सर्व कामे मार्गी लावावीत अशी अपेक्षा असल्याचेही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इंदापूर शहराच्या विस्तारलेल्या भागाचा विकास व्हावा म्हणून दहा कोटी चा निधी देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे शहराच्या ज्या प्रभागाचा विकास झाला नाही तो बॅक लॉक या निधीच्या माध्यमातून भरून काढला जाईल. मात्र यासाठी हेवेदावे व पक्षभेद सोडून सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्ष यांनी एकत्र बसून मार्ग काढावा. शहराच्या हद्दीत असलेल्या सर्व चौकांचे सुशोभीकरण करण्यासाठी काही निधी वर्ग झाला आहे.त्यामुळे सर्व चौकांचे सुशोभीकरण होणार असल्याची माहितीही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
शिवाय रमाई योजनेतील घरकुले मंजूर करण्यासाठी पुणे येथे सोमवारी विशेष बैठक समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत आयोजित केली असून शहराच्या भुयारी गटार योजने आवश्यक असणारा निधी शासन दतबारी पाठपुरावा करून निधी खेचून आणला जाईल.शहरातील रस्त्यावर ची अतिक्रमणे वाढली आहेत याकडे ही नगरपरिषद व बांधकाम आणि पोलिस विभागाने लक्ष घालून ती काढावीत. मात्र परंतु हातावरची पोटे असणारांना पर्यायी जागा उपलब्ध करून,त्यांचे व्यवसाय सुरळीत व्हावेत याची दक्षता ही घ्यावी. असेही दत्तात्रय भरणे म्हणाले.
यावेळी इंदापूर शहराच्या नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की, नगराध्यक्ष म्हणून तीन वर्षे पूर्ण केलेले आहेत यामध्ये पूर्ण इंदापूर करांनी आपणाला मोलाचे सहकार्य केले.भारतात 46 हजार दोनशे नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला होता.यामध्ये स्वच्छ भारत सर्वेक्षणात इंदापूर नगरपरिषदेला देशात दहावा क्रमांक मिळाला. नुकत्याच जाहीर झालेल्या बक्षीस मध्ये थ्री स्टार नामांकन शहराला मिळाले असून शहराच्या नावलौकिकात भर पडली आहे.शहरातील नागरिकांनी कोरोणा या विषारी रोगापासून बचाव करण्यासाठी स्वतः मोठी खबरदारी घ्यावी.नगरपालिकेच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी व उपाय योजना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, शहराच्या विकासासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून द्यावा अशीही अपेक्षा नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी व्यक्त केली.
“मालोजी राजे यांची गढी उभारण्यासाठी शासनाचा निधी हवा ”
इंदापूर शहराला ऐतिहासिक वारसा असल्यामुळे याठिकाणी मालोजी राजे यांची गडी ऐतिहासिक उभारण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्राच्या अंतर्गत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा.तसेच साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा शतकोत्तर जयंती सोहळा असल्याने या ठिकाणी शिल्पा साठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केली.






