पत्रकार हा निर्भिड असायला हवा वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री
मुंबई ; प्रतिनिधी/ लियाकत शाह
पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जर्नालिस्टस युनियन ऑफ महाराष्ट्र च्या वतीने प्रेस क्लब, मुंबई येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्यांनी सर्व पत्रकार बांधवाना तसेच पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांनी पत्रजर हा निर्भीड असला पाहिजे तसेच सत्ताधाऱ्यांकडून काही चुकत असल्यास ते पत्रकारांनी निष्पक्षपणे लक्षात आणून द्यायला हवे असे सांगितले यापुढील काळात आपणा सर्व पत्रकार बंधू-भगिनींचा सहयोग आणि सहकार्य आम्हाला सतत मिळत राहो अशी प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी पुरस्काराचे मानकरी अनंत नलावड़े, मंत्रालय प्रतिनिधी, अरुण कुलकर्णी-जेष्ठ फोटोग्राफर, (राजभवन), जिग्ना कपूरिया-पत्रकार(गुजराती समाचार),चंद्रकांत खुताडे – ग्रामीण विभाग पत्रकार) तसेच संघटनेचे अध्यक्ष नारायण पांचाळ,सरचिटणीस हेमंत सामंत, उपाध्यक्ष जयराम सावंत, खजिनदार प्रवीण दवणे, धगधगती मुंबईचे संपादक भिमराव धुळप, भगवान साळवी, निलेश घाडगे, पत्रकार मित्र राजू गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते






