?️ Big Breaking..लॉक डाऊन च्या शिथिलते नंतर पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ…
दत्ता पारेकर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू झाला आहे. या पाचव्या टप्प्यामध्ये नियम शिथिल करण्यात आले आणि हळूहळू राज्य अनलॉक होण्याच्या मार्गावर आहे. नियम शिथिल होताच पुण्यातील एका भागात रुग्ण झपाट्याने वाढल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
लॉक डाऊन शिथिल होताच पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिसांनी आज या भागातून रूटमार्च काढला आणि लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं. संपूर्ण लॉकडाऊनमध्ये या भागात अवघे 12 रुग्ण होते. पण लॉकडाऊन नियम शिथिल होताच इथे रूग्ण संख्या थेट 372 वर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
विशेषत: जनता वसाहत आणि पानमळा या स्लम एरियात कोरोनाची साथ वेगाने पसरू लागली आहे. त्यामुळे नियम जरी शिथिल झाले असले तरी अत्यावश्यक काम वगळता बाहेर न जाण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे कोरोनाचा हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शक्य तितकं घरात आणि सुरक्षित राहणं गरजेचं आहे.






